Kalamnuri Gang War: कळमनुरीत जुलै १५ रोजी नाइट एक गोळीबारीत एक ठार, चार जखमी झाल्या; सात आरोपी ताब्यात घेतल्या. पोलिसांनी दहा आठवड्यापूर्वी गनहा दाखल करून आरोपीवर कट्टर
कळमनुरी पोलिसात 16 आरोपीवर गुन्हे दाखल; सात जणांना घेतले ताब्यात
कळमनुरी (Kalamnuri Gang War) : शहरात बुधवारी १५ जुलै रोजी रात्री झालेल्या गोळीबाराच्या थरारक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. देशी कट्ट्यातून झालेल्या गोळीबारात लुकमान सिद्दीकी ताजोद्दीन सिद्दीकी (वय ३८, रा. जुने बसस्थानक, कळमनुरी) यांचा मृत्यू झाला असून ओसामा सिद्दीकी, सारिया सिद्दीकी, इम्रान पठाण आणि मेहराज पठाण हे चौघे जखमी झाले असून त्यांच्यावर नांदेड रुग्णालयात उपचार सुरू आहे.
या (Kalamnuri Gang War) घटनेमुळे कळमनुरी शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शहरात प्रथमच अशा प्रकारे गोळीबार झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जुलै रोजी रात्री सुमारे १०.४५ वाजता जुने बसस्थानक परिसरातील ओसामा सिद्दीकी यांच्या पानटपरीसमोरील रस्त्यावर ही घटना घडली. जुन्या वादातून आरोपी स्कॉर्पिओ वाहन व मोटारसायकलींवर येऊन जमले. त्यानंतर त्यांनी लुकमान सिद्दीकी व त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तींवर देशी कट्ट्यातून गोळीबार केला. या हल्ल्यात लुकमान सिद्दीकी यांचा मृत्यू झाला, तर इतर चौघे जखमी झाले. या प्रकरणी शेरू उर्फ इम्राण अफरोज पठाण (वय १६) यांच्या जबाबावरून कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील विविध कलमांसह शस्त्र अधिनियमाच्या कलम ३ व २५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या (Kalamnuri Gang War) गुन्ह्यात शेख शकील, शेख जम्मू, शेख जमीर, शेख समीर, अझहर पठाण, शाहीन नाईक, फयुम नाईक, किशोर भालेराव (नगरसेवक), शेख फारुख, शेख असिफ, साहील नाईक, शेख शहबाज, सय्यद फारुख, मुस्तकीन शेख गणी, इम्रान खान दाऊद खान पठाण आणि शिबगत उर्फ शिबू नाईक यांच्यासह एकूण १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी फरार आहेत. या गंभीर घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक जमीर ए. नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. कळमनुरी सारख्या शांत शहरात प्रथमच झालेल्या या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करून आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पोलीसांच्या सतर्कतेमुळे शहरात शांतता
शहरात प्रथमच देशी कट्ट्याने गोळ्या झाडण्यात आले यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले असता याची माहिती मिळतात पोलीस निरीक्षक जमीर नाईक, स.पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे यांचे सहा शहरात कोणती अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेतली तसेच घटनेची माहिती मिळतात पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, पोलीस उपाधीक्षक वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांनी तात्काळ कळमनुरी येथे येऊन घटनेचे माहिती घेऊन आरोपीचे शोधात निघाल्याने शहरात कोणतीही अनुचित प्रकार घडले नाही हे विशेष बाब.
गुन्ह्यात काही आरोपींना घेतले ताब्यात
घटनेची गांभीरता पाहता पोलिसांनी कोणते निष्काळजीपणा न करता आरोपी फरार होऊ नये यासाठी रात्रीपासूनच आरोपीचे शोध सुरू केले असता या घटनेतील सात आरोपी ताब्यात घेतल्याची माहिती असून उर्वरित आरोपी शोधासाठी पथकामार्फत प्रयत्न सुरू आहे.
शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त
कळमनुरी शहरात झालेले घटनेत (Kalamnuri Gang War) कोणते अनुचित प्रकार घडू नये यासाठी इंदिरानगर, जुना बस स्थानक परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी कुंदन कुमार वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले हे कळमनुरी येथे तळ ठोकून आहे
मुख्य आरोपीच्या अटकेसाठी भरपावसात रास्तारोको आंदोलन
या (Kalamnuri Gang War) प्रकरणात कळमनुरी पोलिस ठाण्यात १६ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्यामध्ये पोलिसांनी सात आरोपींना ताब्यात घेतले आहे. परंतु गुन्ह्यातील मुख्य आरोपीला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी संतप्त नागरीकांनी रूग्णवाहीकेतून शवविच्छेदन करून आणलेल्या मृतदेहासह रास्तारोको आंदोलन भर पावसात केले. नागरीकांच्या भावना संतप्त होत असल्याने उपविभागीय दंडाधिकारी प्रतिक्षा भुते यांनी नागरीकांशी संवाद साधून लेखी आश्वासन दिले. ज्यामध्ये यातील पिडीत इसमाच्या कुटूंबास योग्य ते संरक्षण पुरविण्यात यावे, यातील मुख्य फरार आरोपींना शेख शकील शेख खलिल, नगरसेवक किशोर भालेराव, फईम नाईक या आरोपींना लवकरात लवकर अटक करावी तसेच या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून योग्य वेळेत दोषारोप पत्र न्यायालयात सादर करावे असे पत्रामध्ये नमुद केले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी कुंदनकुमार वाघमारे, तहसीलदार जीवककुमार कांबळे, पोलिस निरीक्षक जमीर नाईक यांची उपस्थिती होती. नागरीकांनी रास्तारोको आंदोलन केल्यानंतर मृतदेहावर दफनविधी करण्यात आला.