Jio-Airtel Recharge Plan: जिओ (Jio) आणि एअरटेल (Airtel) वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या 3 ते 4 महिन्यांत मोबाईल रिचार्ज प्लॅन्सच्या किमती 12 ते 15 टक्क्यांनी वाढ
नवी दिल्ली/ मुंबई (Jio-Airtel Recharge Plan) : जिओ (Jio) आणि एअरटेल (Airtel) वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या 3 ते 4 महिन्यांत मोबाईल रिचार्ज प्लॅन्सच्या किमती 12 ते 15 टक्क्यांनी वाढू शकतात, असा अंदाज दूरसंचार क्षेत्रातील एका संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे लाखो ग्राहकांच्या मासिक खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.
अहवालानुसार, दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धा कमी होऊन काही मोजक्या कंपन्यांचे वर्चस्व वाढत असल्याने दरवाढीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय 4G आणि 5G सेवांचा वाढता वापर, नेटवर्क विस्तार आणि वाढलेला ऑपरेशनल खर्च यामुळे कंपन्या (Recharge Plan) रिचार्ज प्लॅन्स महाग करण्याचा विचार करू शकतात.
5G विस्तारामुळे खर्च वाढला
गेल्या काही वर्षांत 2G वरून 4G आणि 5G सेवांकडे ग्राहकांचा मोठ्या प्रमाणात कल वाढला आहे. त्याचबरोबर (Recharge Plan) डेटा वापरातही सातत्याने वाढ होत असल्याने कंपन्यांवर अतिरिक्त गुंतवणुकीचा भार पडत आहे. रिलायन्स जिओ (Jio-Airtel) आणि एअरटेलने देशातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये 5G सेवा सुरू केल्या असून, पुढील काळात नेटवर्क अधिक मजबूत करण्यावर त्यांचा भर आहे.
ग्राहकसंख्या वाढण्याची शक्यता
अंदाजानुसार, रिलायन्स जिओ आणि (Jio-Airtel) एअरटेल या दोन्ही कंपन्या आगामी तिमाहीत मोठ्या प्रमाणात नवीन ग्राहक जोडू शकतात. दुसरीकडे, व्होडाफोन आयडियाही ग्राहकसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. वाढत्या गुंतवणुकीमुळे आणि नेटवर्क विस्तारामुळे (Recharge Plan) रिचार्ज दर वाढण्याची शक्यता अधिक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
दरम्यान, रिचार्ज दरवाढीबाबत Jio किंवा Airtel यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, संशोधन अहवालातील अंदाजामुळे ग्राहकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.