Breaking News
  • सुनेत्रा पवारांवरील टीकेवरून संजय काकडेंचे शरद पवार व राहुल गांधींना पत्र
  • आंबोली धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात बंद
  • धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा अमेरिकेच्या दबावामुळे द्यावा लागला - शेतकरी नेते -राकेश टिकैत
  • झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा - अभिजीत दिपके
  • पुण्यातील चारही धरणे १०० टक्के भरले
  • वैशाली नागवडे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड
  • पालघरच्या एमआयडीसीतील कारखान्यात भीषण आग
  • पुण्यात पोलिसांनीच घेतली पोलिसांची "शाळा"
  • Beed : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची विशेष सुनावणी

होम > महाराष्ट्र

शेतकरी नेते राकेश टिकैत

देशात पुन्हा मोठे आंदोलन उभारणार: शेतकरी नेते राकेश टिकैत

Farmer leader Rakesh Tikait: केंद्र सरकारच्या धोरणांमुळे आणि भारत-अमेरिका यांच्यातील प्रस्तावित ट्रेड डीलमुळे देशातील शेतकरी, मजूर, छोटे व्यापारी, पशुपालक व फळ-धान्य उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान


देशात पुन्हा मोठे आंदोलन उभारणार शेतकरी नेते राकेश टिकैत

Farmer leader Rakesh Tikait |

 

'अमेरिका ट्रेड डील'मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

नांदेड (Farmer leader Rakesh Tikait) : केंद्र सरकारच्या धोरणांमुळे आणि भारत-अमेरिका यांच्यातील प्रस्तावित ट्रेड डीलमुळे देशातील शेतकरी, मजूर, छोटे व्यापारी, पशुपालक व फळ-धान्य उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. या कराराविरोधात भारतीय किसान युनियनतर्फे देशभर जनजागरण मोहीम राबवली जात असून, येत्या काळात देशात पुन्हा एकदा मोठे शेतकरी आंदोलन उभे राहील, असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी दिला आहे.नांदेड येथे आयोजित 'अमेरिका ट्रेड डील विरोधी जनजागरण मोहीम व जिल्हा शेतकरी मेळाव्या'दरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते.

माध्यमांशी संवाद साधताना राकेश टिकैत (Rakesh Tikait) म्हणाले की, "शेतकऱ्यांनी जमिनी विकाव्यात आणि उद्योगपतींनी त्या हडपाव्यात, अशी सरकारची धोरणे आहेत. दिल्लीची कलम बेईमान असल्याचे आता तरुण आणि शेतकऱ्यांच्या लक्षात आले आहे. जमीन विकून घराचा कारभार चालवू नका, तर पिकांची योग्य विक्री करून संसार चालवा आणि जमिनी वाचवण्यासाठी आंदोलनात उतरा," असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.

नांदेडच्या भूमीचे महत्त्व अधोरेखित करताना टिकैत (Rakesh Tikait) म्हणाले की, "नांदेड ही पवित्र गुरूंची भूमी आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशासह देशभरातील शेतकरी येथे येतात. त्यामुळे नांदेड हे केंद्र बनवून महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे मजबूत संघटन उभारले जाईल आणि इथूनच भविष्यातील मोठ्या लढ्याची पायाभरणी होईल."असेही ते म्हणाले.

तसेच दिल्ली येथील आंदोलक तरुणांवर पोलिसांकडून केली जाणारी कारवाई आणि दाखल गुन्ह्यांवर भाष्य करताना टिकैत म्हणाले की, "तरुणांवर दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत. पोलिसांनी त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करू नयेत. अन्यथा शेतकरी या अन्यायाविरुद्ध लढायला व आंदोलनासाठी पूर्णपणे तयार असल्याचेही ते म्हणाले.

भारतीय किसान यूनियन महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने भारत अमेरिका ट्रेड डिल विरोधी जनजागरण मोहिम व नांदेड जिल्हा शेतकरी मिळावा, नांदेड शहरातील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात बुधवारी आयोजित करण्यात आला होता.यादरम्यांन भारतीय किसान युनियमध्ये काही शेतकऱ्यांची निवड देखील करण्यात आली.

यावेळी भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता चौधरी राकेश टिकेत,राष्ट्रीय महासचिव युद्धवीरसिंग सेहरावत, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाई चंद्रशेखर नलावडे, प्रदेश महासचिव रूपालीताई पाटील,जिल्हाध्यक्ष सुभाष शिंदे,संतोष जाधव, जगदिश जाधव, धनंजय कौशल्य, कामगार नेते विजय गाबणे,शेतकरी नेते डाॅ.भगवान मनुरकर ,डाॅ.गितांजली नाईक,चिमणजी पाटील,कृष्णा जाधव,परमेश्वर जाधव यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती

Related to this topic: