Nandigram Express Decoration: 'फर्स्ट एससी' डब्यात अनधिकृतपणे घुसून सजावत असलेल्या खाजगी डेकोरेटरवर रेल्वे कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला. यावर तिकीट तपासणीच्या टीसाला निलंबित केले.
रेल्वेकडून टीसी निलंबित, डेकोरेटरवर गुन्हा दाखल
नांदेड (Nandigram Express Decoration) : बल्लारशाह-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेसच्या (११००२) 'फर्स्ट एसी' डब्यात अनधिकृतपणे प्रवेश करून कुपेची सजावट केल्याप्रकरणी दक्षिण मध्य रेल्वेने कडक पावले उचलली आहेत. या सुरक्षेतील गंभीर चुकीप्रकरणी कर्तव्यात कसूर करणार्या तिकीट तपासनिसाला (टीसी) रेल्वे प्रशासनाने तडकाफडकी निलंबित केले असून, जालना येथील संबंधित खाजगी डेकोरेटरवर रेल्वे कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ६ जुलै २०२६ रोजी जालना रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. एका प्रवाशाच्या सांगण्यावरून जालना येथील (Nandigram Express Decoration) एका खाजगी डेकोरेटरने कोणत्याही परवानगीशिवाय नंदीग्राम एक्सप्रेसच्या फर्स्ट एसी कोचमध्ये प्रवेश केला आणि प्रवाशाच्या कूपेमध्ये सजावट केली. आरक्षित डब्यात अधिकृत प्रवासी आणि रेल्वे कर्मचार्यांशिवाय बाहेरील व्यक्तीला जाण्यास सक्त मनाई असते. मात्र, हा डेकोरेटर डब्यात शिरल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता.
ही (Nandigram Express Decoration) बाब रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर नांदेड विभागाने याची अत्यंत गंभीर दखल घेतली. अनधिकृत व्यक्तीला डब्यात प्रवेश करण्यापासून न रोखल्यामुळे संबंधित तिकीट तपासणी कर्मचार्याला पुढील चौकशी संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाची सखोल विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीअंती जे दोषी आढळतील त्यांच्यावर शिस्तभंगाची कठोर कारवाई केली जाईल, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, नियम मोडून ट्रेनमध्ये सजावट करणार्या जालना येथील डेकोरेटरवर रेल्वे कायद्यान्वये ट्रेनमध्ये अनधिकृत प्रवेश करणे, विनातिकीट प्रवास आणि रेल्वे हद्दीत घुसखोरी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.