Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > महाराष्ट्र

भारतीय कृषी अनुसंधान परिषद

कृषी विज्ञान केंद्र, वाशिम येथे नाविन्यपूर्ण शेतकरी सन्मान, वैज्ञानिक मार्गदर्शन व कृषी चर्चासत्र उत्साहात

Indian Agricultural Research Council : भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR), नवी दिल्ली यांच्या ९८ व्या स्थापना दिनानिमित्त कृषी विज्ञान केंद्र, वाशिम यांच्या वतीने “नाविन्यपूर्ण कृतीशील शेतकरी


कृषी विज्ञान केंद्र वाशिम येथे नाविन्यपूर्ण शेतकरी सन्मान वैज्ञानिक मार्गदर्शन व कृषी चर्चासत्र उत्साहात

Indian Agricultural Research Council |

 

भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा ९८ वा स्थापना दिन

वाशिम (Indian Agricultural Research Council) : भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR), नवी दिल्ली यांच्या ९८ व्या स्थापना दिनानिमित्त कृषी विज्ञान केंद्र, वाशिम यांच्या वतीने “नाविन्यपूर्ण कृतीशील शेतकरी संवाद, कृषी चर्चासत्र व प्रगतिशील शेतकरी गौरव समारंभ” उत्साहात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्र, वाशिमचे प्रमुख डॉ. आर. एल. काळे हे होते. उद्घाटक म्हणून भारतीय स्टेट बँक, रिसोड शाखेचे व्यवस्थापक मुकेश कुमार उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून नगर परिषद, रिसोडचे मुख्याधिकारी सतीष शेवदा यांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी व्यासपीठावर कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. एस. के. देशमुख, आर. एस. डवरे, टी. एस. देशमुख, एन. बी. पाटील, डॉ. डी. एन. इंगोले, मयूर देशमुख तसेच सौ. शुभांगी वाटाणे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या (Indian Agricultural Research Council) स्वागत गीताने झाली. दीपप्रज्वलनानंतर प्रास्ताविक करताना डॉ. एस. के. देशमुख यांनी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या संशोधन, तंत्रज्ञान विकास, कृषी नवकल्पना, हवामान अनुकूल शेती, अन्नसुरक्षा आणि शेतकरी सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.

अध्यक्षीय भाषणात डॉ. आर. एल. काळे यांनी सन्मानित प्रगतिशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. बदलत्या हवामान परिस्थिती, वाढती उत्पादन खर्चाची आव्हाने आणि बाजारपेठेतील स्पर्धा लक्षात घेता शास्त्राधारित, हवामान-स्मार्ट, बाजाराभिमुख व मूल्यवर्धित शेतीचा अवलंब करून शेतीला उद्योगाचे स्वरूप देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. आधुनिक तंत्रज्ञान, पीक विविधीकरण, प्रक्रिया उद्योग आणि विक्री व्यवस्थापन यांचा अवलंब केल्यास शाश्वत उत्पन्न वाढ साध्य होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.

प्रमुख अतिथी सतीष शेवदा यांनी ग्रामीण युवकांनी कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी उद्योजकतेकडे वाटचाल करावी, असे आवाहन केले. यावेळी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार प्राप्त डॉ. हेमंत देशमुख, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार प्राप्त सौ. ललिता विश्वास गोदमले, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त श्री. केशवराव मोतीराम भगत, प्रतिष्ठान शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त बबन तुकाराम कुटे तसेच स्वामित्व योजनेअंतर्गत यशस्वी शेतकरी जगन्नाथ सरकटे (हराळ) यांचा गौरव करण्यात आला. सत्कारानंतर त्यांनी आपल्या यशस्वी कृषी प्रयोगांचे अनुभव उपस्थित शेतकऱ्यांसमोर मांडले.

तांत्रिक सत्रात कृषी विद्या तज्ज्ञ टी. एस. देशमुख यांनी संभाव्य एल-निनो परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हवामानाधारित पीक नियोजन, पावसाच्या प्रत्येक थेंबाचे शेतात संवर्धन, मूलस्थानी जलसंधारण, मृदा आरोग्य संवर्धन, तणनाशकांचा विवेकपूर्ण वापर व एकात्मिक पीक व्यवस्थापन याबाबत शास्त्रीय मार्गदर्शन केले. आर. एस. डवरे यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM), कीडनियंत्रणासाठी जैविक उपाययोजना, फेरोमोन सापळे, पिवळे व निळे चिकट सापळे तसेच संरक्षित ओलीत व्यवस्थापन याविषयी सविस्तर माहिती दिली. याच प्रसंगी एस. आर. बावस्कर यांनी ‘किसान सारथी’ मोबाईल ॲपच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्राच्या वैज्ञानिक सल्ला सेवा, हवामान आधारित सूचना व कृषी तंत्रज्ञान सहज उपलब्ध होत असल्याने प्रत्येक शेतकऱ्याने या ॲपची नोंदणी करून नियमित वापर करावा, असे आवाहन केले. सौ. शुभांगी वाटाणे यांनी पोषणसुरक्षा, पोषण बाग, पोषणयुक्त अन्नाचे महत्त्व आणि ‘पोषण शेती ते निरोगी कुटुंब’ या संकल्पनेवर मार्गदर्शन केले.

या (Indian Agricultural Research Council) कार्यक्रमात कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे महादेवआप्पा घळे, सुखदेव चाटे, शंकर ठाकरे, कु. जयश्री विष्णू ढोरे, शुभम विजय खडसे, चंद्रकांत रामधन राठोड, संदीप पोफळे, दिलीप लक्ष्मणराव वाघ, गजानन देशमुख, मोबीन शहा आणि सुनील कोल्हे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. सन्मानित शेतकऱ्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण कृषी उपक्रमांचे अनुभव मांडत शास्त्राधारित शेतीमुळे उत्पादनवाढ, खर्चात बचत आणि उत्पन्नात वाढ झाल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शुभांगी वाटाणे यांनी केले, तर मयूर देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी, महिला शेतकरी, युवक, कृषी उद्योजक आणि कृषी क्षेत्रातील विविध घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related to this topic: