Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > महाराष्ट्र

ईडब्ल्यूस विद्यार्थी आरक्षण

ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांना १० टक्के आरक्षण द्या; आमदार अभिमन्यू पवारांची मागणी

EWS Student Reservation: आर्थिकदुरित बालकांसाठी केंद्रातील जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये १० टक्के आरक्षण मागणी आमदार अभिमन्यू पवारांनी केली. या मागणीसाठी त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धरेंद्र प्रधान


ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांना १० टक्के आरक्षण द्या आमदार अभिमन्यू पवारांची मागणी

EWS Student Reservation |

 

फडणवीसांच्या शिफारशीची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून दखल!

औसा (EWS Student Reservation) : देशातील केंद्रीय विद्यालये आणि जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) विद्यार्थ्यांना नियमानुसार १० टक्के आरक्षणाचा लाभ मिळावा, या मागणीसाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे या मागणीसंदर्भातील शिफारसपत्र केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे सादर केले.

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील, शेतकरी कुटुंबांतील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अनेक गुणवंत विद्यार्थी केवळ (EWS Student Reservation) आर्थिक अडचणींमुळे दर्जेदार शिक्षणाच्या संधींपासून वंचित राहत असल्याची बाब आमदार पवार यांनी शिक्षणमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. राष्ट्रीय स्तरावर गुणवत्तापूर्ण आणि स्पर्धात्मक शिक्षण देणाऱ्या केंद्रीय विद्यालये तसेच जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये अशा विद्यार्थ्यांना न्याय्य प्रतिनिधित्व मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. याच पार्श्वभूमीवर देशातील सर्व केंद्रीय विद्यालयांमध्ये तसेच जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांसाठी १० टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी केली. या निर्णयामुळे ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध होऊन सामाजिक न्यायाची संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविली जाईल, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या विषयाबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सकारात्मक भूमिका घेत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना पत्राद्वारे विनंती केली होती. मंगळवारी झालेल्या भेटीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मागणीसंदर्भातील शिफारसपत्र केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे सादर केले. या (EWS Student Reservation) मागणीकडे सकारात्मक दृष्टीने पाहत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संबंधित विभागाकडून प्रस्ताव मागवून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली.  

Related to this topic: