Breaking News
  • साताऱ्यातील पाथरपुंजला सर्वात जास्त पावसाची नोंद
  • लोणावळ्यात 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद.
  • सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
  • पुण्यातील स्टील गोडाऊनवर गोळीबार प्रकरणी वापरण्यात आलेली बाईक पोलिसांकडून जप्त
  • विलास घुले हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन
  • जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
  • अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात दमदार पाऊस
  • नाशिकच्या सातपूर एमआयडीसी परिसरात एका कंपनीला भीषण आग
  • महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधात सोलापुरातील मनसे झाली आक्रमक

होम > महाराष्ट्र

२३ वर्षीय विवाहितेवर सासऱ्यानेच वर्षभर केला अत्याचार

शहरातील २३ वर्षीय विवाहितेवर सासऱ्याने वर्षभर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडीतेच्या पतीने वडिलांच्या कृत्याला पाठिंबा दिल्याने त्यालाही सहआरोपी केले आहे.


२३ वर्षीय विवाहितेवर सासऱ्यानेच वर्षभर केला अत्याचार

Domestic Violence |

खुलताबाद शहरातील धक्कादायक घटना

खुलताबाद (Domestic Violence) : शहरातील २३ वर्षीय विवाहितेवर सासऱ्याने वर्षभर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडीतेच्या पतीने वडिलांच्या कृत्याला पाठिंबा दिल्याने त्यालाही सहआरोपी केले आहे.

पीडितेचा विवाह २०१९ मध्ये झाला. ती पती, सासू-सासरे व मुलांसह राहत होती. तिचा पती रात्रपाळीत नोकरी करत होता. वर्षभरापासून सासरा तिच्याकडे वाईट नजरेने पाहत असे. तसेच विवाहितेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होता.

पीडीतेने या प्रकाराला विरोध केला, मात्र सासऱ्याकडून तिला धमकावले जात होते. 

पती रात्री कामावर गेल्यानंतर सासरा वारंवार तिच्यावर अत्याचार करत होता. हा प्रकार पीडितेने सासूला सांगितला असता, 'कोणाला सांगू नको, मी समजावतें' असे सांगून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र, सासऱ्याच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही. यानंतर पीडितेने पतीला सर्व प्रकार सांगितला असता, त्याने उलट 'वडील तुझी काळजी घेत आहेत', असे सांगून वडिलांची बाजू घेतली. तसेच पुढे पतीने तिच्याशी संवाद कमी केला आणि ४ महिन्यांपूर्वी पीडीतेचा पती घर सोडून निघून गेला.

या प्रकरणाबाबत अधिक माहिती खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निरीक्षक धनंजय फराटे यांनी दिली आहे.

Related to this topic: