FSSAIने '100% Pure', '100% Natural' इत्यादीच्या दाव्यांमुळे डाबरचा सात उत्पादनांचा विक्रेती तात्पुरती रोक लावली आहे. मात्र, ही कारवाई उत्पादनांच्या गुणवत्तेमुळे किंवा सुरक्षिततेमुळे नसून पॅकेजिंग
नवी दिल्ली (Dabur India Products) : पॅकेजिंगवर "100% Pure", "100% Natural", "100% Purity Guaranteed" अशा दाव्यांसह विकल्या जाणाऱ्या डाबर इंडिया (Dabur India) च्या सात खाद्यपदार्थांच्या विक्रीवर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) तात्पुरती रोक लावली आहे. मात्र, ही कारवाई उत्पादनांच्या गुणवत्तेमुळे किंवा सुरक्षिततेमुळे नसून पॅकेजिंग आणि जाहिरातीतील दाव्यांमुळे करण्यात आली आहे.
'100%' दाव्यावर FSSAI चे निर्देश
FSSAIच्या म्हणण्यानुसार, विद्यमान नियमांमध्ये "100%" या शब्दाची स्पष्ट कायदेशीर व्याख्या नाही. त्यामुळे "100% Pure" किंवा "100% Natural" असे दावे ग्राहकांची दिशाभूल करू शकतात. अशा प्रकारचे दावे Food Safety and Standards (Advertising & Claims) Regulations, 2018 चे उल्लंघन ठरू शकतात.
कोणत्या बाबींवर आक्षेप?
तपासादरम्यान, Dabur Honey, Dabur Apple Cider Vinegar, Dabur Virgin Coconut Oil, Dabur Sesame Oil, Dabur Cow Ghee आणि Dabur Coconut Water या उत्पादनांवर Jaivik Bharat लोगो वापरण्यात आल्याचे आढळले. मात्र, संबंधित उत्पादनांकडे त्या वेळी आवश्यक वैध सेंद्रिय (Organic) मान्यता नसल्याचा FSSAIचा दावा आहे. तसेच Dabur Hommade Coconut Milk वर "100% Purity" असा दावा केल्याबाबतही नियामकाने आक्षेप घेतला आहे.
15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश
FSSAIने डाबरला संबंधित उत्पादनांची विक्री थांबवून 15 दिवसांच्या आत केलेल्या सुधारात्मक कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वीही अशा दाव्यांबाबत कंपनीला नोटीस देण्यात आली होती, मात्र अपेक्षित बदल न झाल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
उत्पादने असुरक्षित आहेत का?
महत्त्वाची बाब म्हणजे, FSSAIने कुठेही ही उत्पादने निकृष्ट, भेसळयुक्त किंवा आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे म्हटलेले नाही. नियामकाची हरकत केवळ लेबलिंग, जाहिराती आणि "100%" अशा दाव्यांपुरती मर्यादित आहे. भविष्यात अशाच प्रकारच्या दाव्यांची इतर खाद्य कंपन्यांच्या उत्पादनांवरही तपासणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.