Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > महाराष्ट्र

SBI कार्डधारकांना मोठा झटका! 1 जुलैपासून रिवॉर्ड पॉइंट्समध्ये मोठी कपात

एसबीआय कार्डने या प्रीमियम को-ब्रँडेड क्रेडिट कार्डच्या रिवॉर्ड सिस्टीममध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत.


sbi कार्डधारकांना मोठा झटका 1 जुलैपासून रिवॉर्ड पॉइंट्समध्ये मोठी कपात

Credit Card Updates |

मुंबई (Credit Card Updates) : एसबीआय कार्डने या प्रीमियम को-ब्रँडेड क्रेडिट कार्डच्या रिवॉर्ड सिस्टीममध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत. हे नवे नियम 1 जुलै 2026 पासून लागू होणार असून, त्यामुळे कार्डधारकांना मिळणारे अनेक फायदे कमी होणार आहेत.

युटिलिटी बिल पेमेंटवरील रिवॉर्ड्समध्ये कपात

सध्या फोन पे ॲपद्वारे वीज, पाणी, गॅस बिले, मोबाईल रिचार्ज किंवा विमा हप्ते भरल्यास प्रत्येक 100 रुपयांच्या खर्चावर 10 रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात. या रिवॉर्ड्सची कमाल मर्यादा दरमहा 2,000 पॉइंट्स आहे.
मात्र, 1 जुलैपासून ही मर्यादा दोन भागांत विभागण्यात आली आहे.

नव्या नियमानुसार :
•    विमा प्रीमियम भरण्यावर दरमहा जास्तीत जास्त 500 रिवॉर्ड पॉइंट्स
•    इतर युटिलिटी व्यवहारांवर जास्तीत जास्त 1,500 रिवॉर्ड पॉइंट्स
मिळू शकतील.

ऑनलाइन शॉपिंगवरील फायदा निम्मा

ऍमेझॉन, फ्लिपकार्ड, आणि इतर ई-कॉमर्स वेबसाइट्सवर ऑनलाइन खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाही मोठा फटका बसणार आहे. आतापर्यंत ऑनलाइन शॉपिंगवर मिळणाऱ्या 5 टक्के रिवॉर्ड पॉइंट्सची मासिक मर्यादा 2,000 पॉइंट्स होती. आता ती कमी करून 1,000 पॉइंट्स करण्यात आली आहे. त्यामुळे ऑनलाइन खरेदीवरील बचत पूर्वीपेक्षा कमी होणार आहे.

या व्यवहारांवर मिळणार नाहीत रिवॉर्ड पॉइंट्स

1 जुलैपासून खालील व्यवहारांवर कोणतेही रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार नाहीत:
•    टोल पेमेंट
•    सोने, चांदी व दागिन्यांची खरेदी
•    शाळा आणि महाविद्यालयांची फी
•    PhonePe ॲपच्या बाहेर भरलेली युटिलिटी बिले
•    PhonePe ॲपच्या बाहेर भरलेले विमा प्रीमियम
•    PhonePe व्यतिरिक्त इतर माध्यमातून केलेले UPI व्यवहार

काही सुविधा मात्र कायम

रिवॉर्ड पॉइंट्समध्ये कपात झाली असली तरी काही सुविधा पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत.
•    इतर ऑनलाइन आणि ऑफलाइन खर्चांवर 1 टक्के रिवॉर्ड पॉइंट्स
•    पेट्रोल आणि डिझेल खरेदीवर 1 टक्का इंधन अधिभार माफी
•    वर्षातून चार वेळा देशांतर्गत विमानतळ लाउंज प्रवेश
•    कोणत्याही खर्चाच्या अटींशिवाय मोफत Priority Pass सदस्यत्व
वार्षिक शुल्क किती?

PhonePe SBI Card Select Black साठी : 

•    जॉइनिंग फी : 1,499 रुपये
•    वार्षिक नूतनीकरण शुल्क : 1,499 रुपये
आहे.

ग्राहकांनी काय करावे?

तज्ज्ञांच्या मते, या कार्डचा वापर मुख्यतः रिवॉर्ड पॉइंट्ससाठी करणाऱ्या ग्राहकांनी नव्या नियमांचा आढावा घ्यावा. विशेषतः युटिलिटी बिल पेमेंट आणि ऑनलाइन शॉपिंगवर जास्त खर्च करणाऱ्या ग्राहकांच्या बचतीवर या बदलांचा थेट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कार्डचा वापर सुरू ठेवायचा की पर्यायी पर्याय निवडायचा, याचा विचार ग्राहकांनी करणे आवश्यक आहे.