Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > महाराष्ट्र

भोंदू अशोक खरात प्रकरणावर येणार मराठी सिनेमा? अभिनेत्री दीपाली सय्यद महत्त्वाच्या भूमिकेत

नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता.


भोंदू अशोक खरात प्रकरणावर येणार मराठी सिनेमा अभिनेत्री दीपाली सय्यद महत्त्वाच्या भूमिकेत 

Baba Scandal MOVIE |

मुंबई (Baba Scandal MOVIE) : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचे कथित शोषण, आक्षेपार्ह व्हिडीओ आणि राजकीय वर्तुळात झालेली खळबळ यामुळे हे प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय ठरले. आता या गाजलेल्या प्रकरणावर आधारित मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा रंगली असून अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत दीपाली सय्यद झळकणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दीपाली सय्यद यांनी स्वतः या चित्रपटात भूमिका साकारणार असल्याची कबुली दिल्यानंतर या चर्चांना अधिक जोर मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटात अशोक खरात याचा कथित ढोंगीपणा, महिलांची फसवणूक, अंधश्रद्धेच्या माध्यमातून केलेले गैरप्रकार तसेच या प्रकरणाशी संबंधित राजकीय आणि सामाजिक पैलूंवर प्रकाश टाकला जाणार आहे. त्यामुळे हा सिनेमा केवळ एका व्यक्तीच्या कथित कृत्यांपुरता मर्यादित न राहता राज्यातील सामाजिक वास्तव आणि राजकीय घडामोडींनाही स्पर्श करणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी मुलाखतीदरम्यान या चित्रपटाबाबत सविस्तर भाष्य केले. त्या म्हणाल्या, “भोंदू अशोक खरातबद्दल मला ‘बिग बॉस’मधून बाहेर आल्यानंतर माहिती मिळाली. त्यानंतर या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. या प्रकरणावर सिनेमा येत आहे, मात्र मी त्या चित्रपटाची निर्माती नाही. या सिनेमाचे निर्माते वेगळे आहेत. पण एक कलाकार म्हणून मी या चित्रपटात काम करत आहे.”

यावेळी त्यांनी समाजालाही इशारा देत, “अशा भोंदू बाबांपासून लोकांनी सावध राहिले पाहिजे. समाजात अशा प्रकारचे अनेक लोक लपून बसलेले असू शकतात. कोणत्याही बाबावर आंधळा विश्वास ठेवू नये,” असेही आवाहन केले.

दरम्यान, दीपाली सय्यद या नेमकी कोणती भूमिका साकारणार याबाबत त्यांनी स्पष्ट खुलासा टाळला. “आता सगळं सांगितलं तर सिनेमा पाहण्यात मजा काय राहील? माझ्याकडे स्क्रिप्ट आली आहे. ती पूर्ण वाचल्यानंतरच अंतिम निर्णय होईल. पुढील महिन्यापासून चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे,” असे त्यांनी सांगितले. मात्र, त्यांच्या वक्तव्यानंतर त्या रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.

अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांच्या नावाचीही राजकीय आणि सोशल मीडियामध्ये मोठी चर्चा झाली होती. विरोधकांकडून विविध आरोप करण्यात आले होते. यावर बोलताना दीपाली सय्यद म्हणाल्या, “राजकारणात आरोप-प्रत्यारोप होतच असतात. मात्र या प्रकरणात नेमकं सत्य काय आहे, हे प्रेक्षकांना सिनेमा पाहिल्यानंतरच समजेल.”

दरम्यान, या चित्रपटाची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नसली तरी कथानक, कलाकार आणि विषयामुळे हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेचा विषय ठरत आहे. महाराष्ट्रात गाजलेल्या या प्रकरणावर आधारित चित्रपटात नेमकं काय दाखवलं जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related to this topic: