Breaking News
  • सुनेत्रा पवारांवरील टीकेवरून संजय काकडेंचे शरद पवार व राहुल गांधींना पत्र
  • आंबोली धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात बंद
  • धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा अमेरिकेच्या दबावामुळे द्यावा लागला - शेतकरी नेते -राकेश टिकैत
  • झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा - अभिजीत दिपके
  • पुण्यातील चारही धरणे १०० टक्के भरले
  • वैशाली नागवडे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड
  • पालघरच्या एमआयडीसीतील कारखान्यात भीषण आग
  • पुण्यात पोलिसांनीच घेतली पोलिसांची "शाळा"
  • Beed : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची विशेष सुनावणी

होम > महाराष्ट्र

नागपुर युवक काँग्रेस आंदोलन

नागपुरातील व्हेरायटी चौकात युवक काँग्रेसचे ‘अमित शाह जवाब दो’ बॅनर झळकले..

Nagpur Youth Congress Protest: आंदोलनादरम्यान ‘अमित शाह जवाब दो’ असे शीर्षक असलेले मोठे बॅनर उड्डाणपुलावरून झळकविण्यात आले. बॅनरवरील ‘मोदी ने मरवा दिया’ आणि ‘Gen Z से डर गया बूमर मोदी’


नागपुरातील व्हेरायटी चौकात युवक काँग्रेसचे ‘अमित शाह जवाब दो’ बॅनर झळकले

Nagpur Youth Congress Protest |

नागपूर (Nagpur Youth Congress Protest) : दिल्ली येथे २० जुलै रोजी विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ नागपूर शहर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्हेरायटी चौक येथील गांधी पुतळा परिसरातील उड्डाणपुलावर अनोखे आंदोलन केले. आंदोलनादरम्यान ‘अमित शाह जवाब दो’ असे शीर्षक असलेले मोठे बॅनर उड्डाणपुलावरून झळकविण्यात आले. बॅनरवरील ‘मोदी ने मरवा दिया’ आणि ‘Gen Z से डर गया बूमर मोदी’ या घोषणांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी (Nagpur Youth Congress Protest) हातात पक्षाचे झेंडे घेऊन केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कारवाईस जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करत आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारकडून स्पष्टीकरणाची मागणी केली.

या (Nagpur Youth Congress Protest) आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनात युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव अक्षय हेटे, रौनक चौधरी, सुशांत लोखंडे, रजा अली, समीर तिमांडे, साहिल मोहोड, राहुल खैरकर, आयुष गोरले, शिवम चौधरी, आदित्य शिंगाडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.