दिनविशेष

प्रभू श्रीराम हे भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ आणि 'मर्यादा पुरुषोत्तम' मानले जातात.

दिनविशेष

Ram Navami

 आज राम नवमी

अकोला (Ram Navami) : प्रभू श्रीराम हे भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ आणि 'मर्यादा पुरुषोत्तम' मानले जातात. २६ मार्च रोजी संपूर्ण देशात 'श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. चैत्र शुद्ध नवमीला दुपारी १२ वाजता जेव्हा सूर्य डोक्यावर येतो, तेव्हा प्रभू रामांचा जन्म झाला, असे मानले जाते. या दिवशी श्रीरामाच्या बालस्वरूपाची पूजा केली जाते.

अयोध्येतील राजा दशरथ आणि आई राणी कौशल्या यांच्या राजवाड्यात भगवान रामाचा जन्म १९ चैत्र नवमीच्या दिवशी दुपारी अभिजित मुहूर्तावर झाला. यावर्षी रामनवमीचा सण २६ मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. यंदा चैत्रनवरात्र शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून म्हणजेच मार्चपासून गुढी पाडवा दिनी सुरू झाले आणि रामनवमीच्या दिवशी २६ मार्च रोजी समाप्त होईल. रामनवमीला भगवान श्रीरामासह मॉ दुर्गेची नववी शक्ती देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते.

दुष्टशक्तींनी ज्यावेळी भूतलावरील सज्जनांना त्राही भगवान करून सोडले, तेव्हा त्या दुष्टशक्तीच्या निर्दालनासाठी श्रीविष्णूने भूतलावर अवतार घ्यावयाचे मान्य केले. अयोध्येचा राजा दशरथ राज्य करीत होता. तेव्हा त्याचं राज्य मोठं व सुखी होतं. परंतु राजा मात्र दुःखी होता. कारण त्याला मूलबाळ नव्हते. म्हणून त्याने वसिष्ठ ऋषींच्या सांगण्यानुसार मोठा यज्ञ केला. यज्ञामुळे देव प्रसन्न झाले. 'इच्छा लवकर पुरी होईल' असा आशीर्वादही दिला. महिने निघून गेले. आनंदी वातावरण अयोध्या नगरीत दिसू लागले. कौसल्याराणी प्रसूत झाली. तिला मुलगा झाला. हा मुलगा म्हणजे राम. श्रीराम जन्माला आले ती वेळ मध्यान्हीची होती. साऱ्या राज्यभर हत्तीवर बसून मूठ-मूठ साखर वाटली. राम हा सत्यवचनी आज्ञाधारक व होता. लढाईत अचूक बाण मारीत असे म्हणून 'रामबाण' असा आता संकेत ठरला आहे. कित्येक राक्षसांना त्यांनी ठार मारले. हनुमानाच्या साहाय्याने लंकाधीश रावणाचा नाश केला. महर्षि वाल्मिकींनी आपल्या रामायणामध्ये रामराज्य कसे होते, याचे वर्णन केले आहे. दुष्टांवर वचक बसविणे व सज्जनांना अभय देणे, हे त्यांचे जीवितकार्य होते. श्रीराम हे आदर्श पुत्र, आदर्श पती, बंधु, शिष्य, पिता व आदर्श राजा होते. सर्व लोक रामाला देवासमान मानू लागले, रामाची देवळे झाली. नंतर रामनवमीचा उत्सवही सुरू झाला. अयोध्येत हा रामनवमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात होतो.

श्री राम जन्मोत्सव शुभ मुहूर्त

प्रभू श्रीरामांचा जन्म माध्यान्ह काळी (दुपारी) झाला होता. यंदा २६ मार्च रोजी राम जन्मोत्सव. पूजेची मुख्य वेळ : दुपारी ११:०५ ते दुपारी १:३५ वाजेपर्यंत. जन्म वेळः दुपारी १२:०० ते १२:४० च्या दरम्यान राममंदिरांमध्ये पाळणा हलवला जाईल आणि जन्मोत्सव साजरा करण्यात येईल.

संबंधित सामग्री

राम मंदिरात कडक नियम लागू; पुजाऱ्यांच्या मोबाईल वापरावरही बंदी!

राम मंदिरात कडक नियम लागू; पुजाऱ्यांच्या मोबाईल वापरावरही बंदी!

Ayodhya Ram Temple: राम मंदिराच्या व्यवस्थेत महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, मंदिरातील कर्मचारी, अधिकारी आणि पुजाऱ्यांसाठी नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. मंदिराच्या अंतर्गत व्यवस्थेशी संबंधित

Sep 16, 2026
अयोध्या राम मंदिराच्या व्यवस्थापनाची धुरा जितेंद्र मिश्रा यांच्या हाती; पहिले CEO म्हणून निवड

अयोध्या राम मंदिराच्या व्यवस्थापनाची धुरा जितेंद्र मिश्रा यांच्या हाती; पहिले CEO म्हणून निवड

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Sep 02, 2026
रामललाची पुन्हा फसवणूक! तब्बल 4.10 कोटींचा चेक बाऊन्स, खात्यात फक्त 3 रुपये

रामललाची पुन्हा फसवणूक! तब्बल 4.10 कोटींचा चेक बाऊन्स, खात्यात फक्त 3 रुपये

Ayodhya Ramlala Check Bounce: अयोध्या येथील राम मंदिरात भगवान रामलल्ला यांच्याशी संबंधित फसवणुकीचे प्रकार. कोट्यवधी रुपयांच्या देणगीच्या चोरीनंतर, आता 4.10 कोटी रुपयांचा चेक बाऊन्स झाल्याचे प्रकरण

Aug 31, 2026
अयोध्या प्रसादाच्या नावाने मिठाई विक्री; ॲमेझॉनवर दंडात्मक कारवाई

अयोध्या प्रसादाच्या नावाने मिठाई विक्री; ॲमेझॉनवर दंडात्मक कारवाई

Ayodhya Ram Mandir Prasad: अयोध्येतील राम मंदिराचा प्रसाद असल्याचा दावा करून मिठाई व खाद्यपदार्थांची विक्री केल्याप्रकरणी ग्राहक न्यायाधिकरणाने ॲमेझॉनला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला

Aug 20, 2026
‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिरात’ सनराईज इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या भक्तिमय दिंडीचे आकर्ष

‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिरात’ सनराईज इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या भक्तिमय दिंडीचे आकर्ष

Risod Maharajswa Abhiyan: महाराष्ट्र शासन, तहसील कायम करत 'छत्रपती शिवाजीच्या महाराजस्व अभियान' योजनेसाठी रिसोड येथे आयोजित एक सांस्कृतिक कार्यक्रमात सनराईज इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी

Jul 27, 2026