Breaking News
  • मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण, संगमनेरमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल
  • धाराशिवमध्ये 4 गावातील मराठा समाजाचे गावकरी आक्रमक,रास्ता रोको आंदोलन
  • पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या
  • आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी
  • मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट, नशिराबादेत चेन्नई सायबर क्राईमची धडक!
  • लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड
  • नंदुरबारमध्ये 93 लाखांचा 186 किलो गांजा जप्त
  • OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत
  • माकडांमुळे शाळा बंद, विद्यार्थी व शिक्षक शाळा सोडून पळाले

होम > देश

Ram Mandir CEO

अयोध्या राम मंदिराच्या व्यवस्थापनाची धुरा जितेंद्र मिश्रा यांच्या हाती; पहिले CEO म्हणून निवड

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.


अयोध्या राम मंदिराच्या व्यवस्थापनाची धुरा जितेंद्र मिश्रा यांच्या हाती पहिले ceo म्हणून निवड

Ram Mandir CEO |

38 वर्षे भारतीय हवाई दलात सेवा; कारगिल युद्ध आणि ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये बजावली महत्त्वाची भूमिका

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने मंदिराच्या प्रशासकीय व्यवस्थेसाठी पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून भारतीय हवाई दलाचे निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची नियुक्ती केली आहे. नियुक्तीच्या तारखेपासून पुढील तीन वर्षे ते या पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. याच वर्षी एप्रिलमध्ये ते भारतीय हवाई दलातून निवृत्त झाले होते.

38 वर्षांची हवाई दलातील कारकीर्द

जितेंद्र मिश्रा यांनी भारतीय हवाई दलात तब्बल 38 वर्षे सेवा केली आहे. लढाऊ विमानांचे पायलट, कॉम्बॅट इन्स्ट्रक्टर तसेच टेस्ट पायलट म्हणून त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. 1999 मधील कारगिल युद्धासह ‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील रहिवासी असलेले जितेंद्र मिश्रा हे NDA खडकवासलाचे माजी विद्यार्थी आहेत. लढाऊ विमान उड्डाणाचा त्यांना 3 हजार तासांहून अधिक अनुभव आहे. त्यांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवेसाठी त्यांना ‘सर्वोत्तम युद्ध सेवा मेडल’ने गौरवण्यात आले आहे.

5500 हून अधिक अर्ज; 18 उमेदवारांची शॉर्टलिस्ट

राम मंदिराच्या CEO पदासाठी निवड प्रक्रिया व्यापक स्वरूपात राबवण्यात आली. या पदासाठी 5500 हून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. त्यातून 18 उमेदवारांची निवड करून त्यांची शॉर्टलिस्ट तयार करण्यात आली.

शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या उमेदवारांची विविध स्तरांवर पडताळणी करण्यात आली. त्यांच्या खानपानाच्या सवयी, जीवनशैली तसेच हिंदू धर्माशी संबंधित धार्मिक मान्यतांबाबतही सखोल प्रश्न विचारण्यात आले.

CEO निवडण्यासाठी ट्रस्टने तीन सदस्यीय विशेष समितीची स्थापना केली होती. या समितीत निवृत्त न्यायमूर्ती प्रमोद कोहली, विष्णुकांत चतुर्वेदी आणि सुरेश हावडे यांचा समावेश होता.

मंदिराच्या प्रशासनाची मोठी जबाबदारी

जितेंद्र मिश्रा यांच्याकडे राम मंदिराच्या प्रशासकीय व्यवस्थेसोबतच आर्थिक आणि कायदेशीर बाबींची जबाबदारी असणार आहे. मंदिराची सुरक्षा, भाविकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधा, दैनंदिन कामकाजाचे नियोजन आणि आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखणे ही त्यांच्या प्रमुख जबाबदाऱ्यांपैकी असणार आहेत.

दरम्यान, जून-जुलै महिन्यात राम मंदिरातील दानपेटीतील चोरीचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणात पोलिसांनी 8 जणांना अटक केली होती. त्यानंतर अनिल मिश्रा आणि चंपत राय यांना ट्रस्टमधून निरोप घ्यावा लागला होता.

या पार्श्वभूमीवर ट्रस्टच्या कारभारात अधिक पारदर्शकता आणि प्रशासकीय शिस्त आणण्यासाठी राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी स्वतंत्र CEO पदाची गरज व्यक्त केली होती. आता जितेंद्र मिश्रा यांच्या नियुक्तीमुळे मंदिराच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र प्रशासकीय नेतृत्व उपलब्ध झाले आहे.

Related to this topic: