गोंदिया इंधन टंचाई

इंधन टंचाईच्या अफवेने वाहनधारकांची प्रचंड धावपळ; पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा

Gondia Petrol Crisis: गोंदिया जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याच्या अफवामुळे लांबच लांब रांगा लागल्या. प्रशासनाने अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.

इंधन टंचाईच्या अफवेने वाहनधारकांची प्रचंड धावपळ; पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा

Gondia Petrol Crisis

जिल्हा प्रशासनाचे शांततेचे आवाहन

गोंदिया (Gondia Petrol Crisis) : जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली असून, यामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. या (Gondia Petrol Crisis) अफवेपोटी शहरातील सर्वच पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या प्रचंड रांगा लागल्या असून नागरिक इंधन भरण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत. मात्र, जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट करत नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडिया आणि विविध चर्चांमधून "पुढील काही दिवस पेट्रोल-डिझेलचा पुरवठा बंद (Gondia Petrol Crisis) राहणार आहे" अशा स्वरूपाचे संदेश पसरले. या संदेशांमुळे गोंदियातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि आज सायंकाळ झाल्यानंतर  जयस्तंभ चौक,  आणि मुख्य बाजारपेठेतील पेट्रोल पंपांवर दुचाकी व चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. अनेक ठिकाणी तर वाहनांच्या रांगा थेट मुख्य रस्त्यापर्यंत आल्याने वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती. काही नागरिक खबरदारी म्हणून बाटल्या आणि कॅनमध्येही इंधन भरून ठेवताना दिसले, ज्यामुळे पंपांवरील गर्दीत आणखीच भर पडली.

वाहनधारकांमध्ये उडालेली ही खळबळ बघता जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे. जिल्हा पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे की, जिल्ह्यात इंधनाचा कोणताही अधिकृत तुटवडा नाही. तेल कंपन्यांकडून होणारा पुरवठा नियमित सुरू असून टँकर्सचा साठाही नियोजित वेळेनुसार उपलब्ध होत आहे. केवळ अफवांमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात इंधन खरेदी करत असल्याने काही (Gondia Petrol Crisis) पंपांवर तात्पुरती गर्दी दिसत आहे. प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका आणि विनाकारण साठेबाजी करू नका. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या पेट्रोल पंपांवर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला असून, अफवा पसरवणाऱ्यांवर कडक लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी संयम बाळगल्यास सर्वांना सुरळीतपणे इंधन उपलब्ध होईल, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या काही तासांपासून इंधन टंचाई  (Gondia Petrol Crisis) निर्माण होणार असल्याच्या चर्चेने जोर धरल्यामुळे शहराला लागून असलेल्या सर्व पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. पेट्रोल आणि डिझेल संपण्याच्या भीतीपोटी नागरिक आपली वाहने पूर्ण टाकी (Full Tank) भरण्यासाठी पंपांवर धाव घेत आहेत, ज्यामुळे शहरालगतच्या मार्गांवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात इंधन तुटवडा नाही: जिल्हाधिकारी प्रजित नायर

भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल या तिन्ही प्रमुख कंपन्यांकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. जिल्हा प्रशासन आणि तेल कंपन्या जिल्ह्यात इंधनाचा साठा कायम राखण्यासाठी समन्वयाने काम करीत आहे. त्यामुळे इंधनाचा तुटवडा होणार असल्याच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे. गोंदिया जिल्ह्यात (Gondia Petrol Crisis) पेट्रोल-डिझेलची कोणतीही कमतरता नाही. पूर्वी जे दर होते तेच सध्या लागू आहेत. सरकारकडूनही सध्या इंधनाच्या दरात वाढ झालेली नाही, जसे निर्देश येतील तशा सूचना नागरिकांना पर्यंत पोहोचविण्यात येतील. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केलेले आहेत.

संबंधित सामग्री

नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोलीतील पर्यटकांनी जिल्हा आपत्कालीन केंद्राशी संपर्क साधावा

नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोलीतील पर्यटकांनी जिल्हा आपत्कालीन केंद्राशी संपर्क साधावा

नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Aug 27, 2026
नेपाळमध्ये महापुराचा तडाखा; महाबळेश्वरमधील १० महिला पर्यटक पोखरात अडकल्या, प्रशासनाकडून मदतीची तयारी

नेपाळमध्ये महापुराचा तडाखा; महाबळेश्वरमधील १० महिला पर्यटक पोखरात अडकल्या, प्रशासनाकडून मदतीची तयारी

नेपाळमध्ये आलेल्या महापुरामुळे पर्यटन व्यवस्था विस्कळीत झाली असून, महाबळेश्वरमधील दहा महिला पर्यटक पोखरा शहरात अडकल्या आहेत.

Aug 27, 2026
त्या घरपोच नोटीसच्या चर्चेला उधाण; उबाठाकडून खासदार संजय देशमुखांना बजावली नोटीस

त्या घरपोच नोटीसच्या चर्चेला उधाण; उबाठाकडून खासदार संजय देशमुखांना बजावली नोटीस

MP Sanjay Deshmukh: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून बाहेर पडून शिंदे गटात प्रवेश केलेल्या खा . संजय देशमुख सह अन्य ५ खासदारांच्या बंडखोरी व चिन्ह चोरी मुद्द्यावरून राजकीय वातावरण पुन्हा तापले

Aug 18, 2026
पालकमंत्र्यांनी उपोषणार्थींकडे पाठ फिरवल्याने रास्ता रोको आंदोलन

पालकमंत्र्यांनी उपोषणार्थींकडे पाठ फिरवल्याने रास्ता रोको आंदोलन

Rasta Roko Movement: ध्वजारोहणानंतर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी उपोषणकर्त्यांकडे पाठ फिरवित काढता पाय घेतल्यामुळे संतप्त झालेल्या उपोषणकर्त्यांनी आज पालकमंत्र्यांचा निषेध नोंदविला.

Aug 17, 2026