Breaking News
  • तळकोकणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन
  • नाशिकच्या बागलाणमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
  • मयूर रथातून होणार दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक
  • नागपुरात अतिक्रमणधारकांविरोधात मनपा-पोलिसांची कठोर कारवाई
  • बुलडाण्यात आढळला स्वाइन फ्लूचा रुग्ण
  • मानाचा पहिला कसबा गणपती मंदिरासमोर ढोल वादन सुरू
  • गावा गावातून मराठा बांधव आक्रमक, मुंबईच्या दिशेने निघण्याची तयारी सुरू
  • रायगडमध्ये घरोघरी गणरायाच आगमन
  • बाप्पासाठी चांदीचा थाट! येवल्यात चांदीचे मोदक, फुलं अन् उंदीरमामांची क्रेझ

होम > विदेश

Nepal Flood

नेपाळमध्ये महापुराचा तडाखा; महाबळेश्वरमधील १० महिला पर्यटक पोखरात अडकल्या, प्रशासनाकडून मदतीची तयारी

नेपाळमध्ये आलेल्या महापुरामुळे पर्यटन व्यवस्था विस्कळीत झाली असून, महाबळेश्वरमधील दहा महिला पर्यटक पोखरा शहरात अडकल्या आहेत.


नेपाळमध्ये महापुराचा तडाखा महाबळेश्वरमधील १० महिला पर्यटक पोखरात अडकल्या प्रशासनाकडून मदतीची तयारी

Nepal Flood |

मेघा चोरगे यांच्यासह नऊ मैत्रिणी सुरक्षित; कुटुंबीय आणि जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात, सातारा नियंत्रण कक्षाशी संपर्काचे आवाहन

सातारा : नेपाळमध्ये आलेल्या महापुरामुळे पर्यटन व्यवस्था विस्कळीत झाली असून, महाबळेश्वरमधील दहा महिला पर्यटक पोखरा शहरात अडकल्या आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीय तसेच शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख मेघा चोरगे आणि त्यांच्या नऊ मैत्रिणींचा समावेश आहे. या महिला SIT Tours And Travels कंपनीसोबत नेपाळ दौऱ्यावर गेल्या आहेत. सध्या पोखरा येथील हॉटेलमध्ये सर्वजणी सुरक्षित असल्याची माहिती मेघा चोरगे यांनी दिली आहे.

नेपाळमध्ये आलेल्या जलप्रलयामुळे अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून पर्यटनावरही मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाबळेश्वरमधून गेलेल्या महिला पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, ज्या ठिकाणी प्रलयाची तीव्रता आहे, त्या ठिकाणापासून पोखरा सुमारे ३५० किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात आले आहे. पोखरा येथील हॉटेलमध्ये सुरक्षित असल्याचे मेघा चोरगे यांनी स्पष्ट केले असून, त्या कुटुंबीय आणि जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत.

मेघा चोरगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या आणि त्यांच्या नऊ मैत्रिणी अशा दहा जणी SIT Tours And Travelsच्या माध्यमातून नेपाळमध्ये पर्यटनासाठी दाखल झाल्या आहेत. सध्या त्या पोखरा शहरात आहेत. त्यांच्यासोबत असलेल्या काही महिलांना परिस्थितीमुळे असुरक्षित वाटत असल्याने त्या चिंतेत आहेत. दुसरीकडे, मायदेशातील कुटुंबीयांकडूनही त्यांच्या सुरक्षिततेबाबत काळजी व्यक्त केली जात आहे.

मेघा चोरगे या शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख आहेत. नेपाळमधील परिस्थिती लक्षात घेता सर्व महिला पर्यटकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू असल्याचा दिलासा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान, नेपाळमध्ये अडकलेल्या सातारा जिल्ह्यातील पर्यटकांनी तातडीने जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. पूरस्थितीमुळे नेपाळमधील जनजीवन विस्कळीत झाल्याने तेथे अडकलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाकडून संकलित केली जात आहे.

ज्या पर्यटकांचा सध्या त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नाही किंवा जे नेपाळमध्ये अडकले आहेत, त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. यासाठी 02162-232349, 02162-232175 आणि 9657521122 हे क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Related to this topic: