Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

Disaster Management

नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोलीतील पर्यटकांनी जिल्हा आपत्कालीन केंद्राशी संपर्क साधावा

नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.


नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोलीतील पर्यटकांनी जिल्हा आपत्कालीन केंद्राशी संपर्क साधावा

Disaster Management |

पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचे आवाहन; संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी

गडचिरोली : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी तसेच ज्यांचा आपल्या कुटुंबीयांशी संपर्क होत नाही, अशा पर्यटकांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

नेपाळमधील पूरस्थिती लक्षात घेता तेथे असलेल्या पर्यटक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत जिल्हा प्रशासनाकडून माहिती संकलित केली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा कुटुंबीयांशी संपर्क होत नाही, अशा पर्यटकांची माहिती प्रशासनाला तातडीने उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा आपत्कालीन कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन

अडकलेल्या पर्यटकांची माहिती देण्यासाठी जिल्हा आपत्कालीन नियंत्रण कक्ष, गडचिरोली येथे 07132-222031 / 222035 या दूरध्वनी क्रमांकांवर तसेच 9423911077 / 8275370208 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

याशिवाय पोलीस नियंत्रण कक्ष, गडचिरोली येथे 07132-223142 या दूरध्वनी क्रमांकावरही संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध आहे.

पर्यटकांची कोणती माहिती द्यावी?

प्रशासनाशी संपर्क साधताना संबंधित पर्यटकाचे पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण किंवा हॉटेल, प्रवासाचा तपशील तसेच उपलब्ध असल्यास कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक द्यावा. या माहितीच्या आधारे संबंधित व्यक्तीची आवश्यक माहिती संकलित करून पुढील समन्वय साधण्यास मदत होणार आहे.

ऑनलाइन नोंदणीची सुविधाही उपलब्ध

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे नोंदविण्यासाठी ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित पर्यटक किंवा त्यांच्या नातेवाईकांनी ऑनलाइन माध्यमातून माहिती नोंदवावी.

ऑनलाइन नोंदणी लिंक:
https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/

गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आपत्तीग्रस्त भागातील नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक माहिती संकलित करून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याचे प्रयत्न प्रशासनामार्फत सुरू असल्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कळविले आहे.

Related to this topic: