दिनविशेष हिंदू नववर्षाला आजपासून प्रारंभ

गुढीपाडव्याचा सण महाराष्ट्रात प्रामुख्याने हिंदू नववर्ष किंवा नव-संवत्सर सुरू होण्यासाठी साजरा केला जातो.

दिनविशेष हिंदू नववर्षाला आजपासून प्रारंभ

(Gudi Padwa)

नागपूर (Gudi Padwa) : गुढीपाडव्याचा सण महाराष्ट्रात प्रामुख्याने हिंदू नववर्ष किंवा नव-संवत्सर सुरू होण्यासाठी साजरा केला जातो. पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवीन वर्षाची सुरुवात होते आणि या दिवशी गुढीपाडवा हा सण साजरा करण्याची प्रथा आहे. यंदा १९ मार्च गुढीपाडवा रोजी साजरा करण्यात येणार आहे. गुढीपाडव्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. या दिवशी घरोघरी गुढी उभारून मोठ्या जल्लोषात नववर्षाचे स्वागत केले जाते.

शास्त्रानुसार गुढीपाडवा (Gudi Padwa) हा जगातील पहिला दिवसही मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी ब्रह्माजींनी सृष्टीची निर्मिती केली होती, सूर्य देव जगात प्रथमच उदयास आला होता. दुसरीकडे, पौराणिक कथेनुसार, त्रेतायुगात, भगवान श्रीरामांनी या दिवशी बळीचा वध केला आणि लोकांची त्याच्या दहशतीपासून मुक्तता केली. लोक हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा करतात. गुढीपाडवा (Gudi Padwa) हा महाराष्ट्राचा मुख्य सण आहे. गुढी म्हणजे विजय पताका (ध्वज) आणि प्रतिपदेच्या तिथीला पाडवा म्हणतात. या तारखेला 'नवीन वर्ष' असेही म्हणतात. हा दिवस कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये उगादी म्हणून साजरा केला जातो. काश्मीरमध्ये त्याला 'नवरेह' मणिपूरमध्ये साजिबू नोंगमा पनबा म्हणतात. दुसरीकडे गोवा आणि केरळमधील कोकणी समाजातील लोक हा संवत्सर पाडोचा सण म्हणून साजरा करतात. सिंधी समाजातील लोक या दिवशी चेटी चांद सण साजरा करतात.

या दिवशी मराठी समाजातील लोक घराबाहेर गुढी बांधतात आणि तिची पूजा करतात. गुढी हे समृद्धीचे सूचक मानले गेले आहे. नवीन वर्ष सुख, शांती, समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येवो या कामनाने पूजा केली जाते. महाराष्ट्रात घरोघरी गुढी उभारून हिंदू नववर्षाचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले जाते. साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे गुढी पाडवा. दिवसापासून चैत्र महिन्याची सुरुवात होते आणि नूत शालिवाहन शकवर्षाचा प्रारंभ होतो. या

गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त

यंदा गुढीपाडवा (Gudi Padwa) गुरुवार, १९ मार्च रोजी साजरा केला जाईल. हा दिवस मराठी नववर्षाचा (शालिवाहन शके १९४८, पराभव संवत्सर) प्रारंभ. गुढी उभारण्याची वेळ : सकाळी ६ वाजून ५४ मिनिटांनंतर गुढी उभारणे शुभआहे. अभिजित मुहूर्त : दुपारी १२:०० च्या सुमारास असेल, जो नवीन खरेदी किंवा शुभ कार्यासाठी अत्यंत अनुकूल मानला जातो. शास्त्रांनुसार गुढी सूर्योदयानंतर लगेच उभारावी आणि सूर्यास्ताच्या वेळी तिला नमस्कार करून उतरवावी.

संबंधित सामग्री

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AI, डिजिटल माध्यमे, OTT आणि सोशल मीडियातील मराठी कंटेंट वाढवण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Oct 03, 2026
रक्षाबंधन २८ ऑगस्टलाच; भद्रेचा अडथळा नाही, चंद्रग्रहणाचाही परिणाम नाही

रक्षाबंधन २८ ऑगस्टलाच; भद्रेचा अडथळा नाही, चंद्रग्रहणाचाही परिणाम नाही

रक्षाबंधनाच्या तारखेबाबत निर्माण झालेला संभ्रम अखेर दूर झाला आहे.

Aug 28, 2026
‘मराठी सक्तीची नव्हे, भक्तीची भाषा’; १.२५ लाख रिक्षा-टॅक्सी चालकांनी घेतले मराठीचे धडे - एकनाथ शिंदे

‘मराठी सक्तीची नव्हे, भक्तीची भाषा’; १.२५ लाख रिक्षा-टॅक्सी चालकांनी घेतले मराठीचे धडे - एकनाथ शिंदे

महाराष्ट्रात मराठी भाषेचा प्रसार कायद्याच्या दबावातून नव्हे, तर प्रेम आणि आत्मीयतेतून व्हावा, अशी भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली.

Aug 18, 2026
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिव कुटुंब मेळाव्याला प्रतिसाद; मराठा सेवा संघ हिंगोलीचा अभिनव उपक्रम

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिव कुटुंब मेळाव्याला प्रतिसाद; मराठा सेवा संघ हिंगोलीचा अभिनव उपक्रम

Shiva Rajyabhishek ceremony: हिंगोलीत शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी मराठा सेवा संघाने पहिल्यांदाच शिव कुटुंब मेळावा आयोजित केला. हॉटेल शांतीत पाच सत्रांमध्ये पूजन, व्याख्यान

Jun 07, 2026
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त ‘राजा छत्रपती’ चित्रपटाचे स्क्रीनिंग

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त ‘राजा छत्रपती’ चित्रपटाचे स्क्रीनिंग

सध्या सर्वत्र ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. १ मे रोजी चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटगृहांबाहेर प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

May 17, 2026