शिवराज्याभिषेक दिन

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिव कुटुंब मेळाव्याला प्रतिसाद; मराठा सेवा संघ हिंगोलीचा अभिनव उपक्रम

Shiva Rajyabhishek ceremony: हिंगोलीत शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी मराठा सेवा संघाने पहिल्यांदाच शिव कुटुंब मेळावा आयोजित केला. हॉटेल शांतीत पाच सत्रांमध्ये पूजन, व्याख्यान

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिव कुटुंब मेळाव्याला प्रतिसाद; मराठा सेवा संघ हिंगोलीचा अभिनव उपक्रम

Shiva Rajyabhishek ceremony

हिंगोली (Shiva Rajyabhishek ceremony) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५२ वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्त मराठा सेवा संघ व संबंधित कक्षाच्या वतीने, हिंगोली येथील हॉटेल शांती मध्ये ६ जूनला दिवसभर विविध उपक्रमासह प्रथमच शिव कुटुंब मेळावा घेण्यात आला. दिवसभरातील पाच सत्रांमध्ये विविध उपक्रम घेऊन शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सकाळी साडेआठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये शिवप्रतिमेचे चे पूजन करून छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले.
 
हॉटेल शांती मध्ये प्रथम सत्रा मध्ये मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज *Shiva Rajyabhishek ceremony( यांच्या प्रतिमांचे पूजन करून मान्यवरांची मनोगते घेण्यात आली व प्रा. डाँ. दत्ता  सावंत यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले. सर्वांनी सर्व जनतेला शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे,उद्घाटक म्हणून आमदार तान्हाजीराव मुटकुळे, प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी नगराध्यक्ष दिलीपराव चव्हाण, मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल सवनेकर, जिजाऊ ब्रिगेडच्या सुनीताताई मुळे, माजी शिक्षणाधिकारी शिवाजीराव पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या सत्राचे सूत्रसंचालन नितीन इंगळे, जिजाऊ वंदना डाँ. ऋतुजा राजकुमार वायचाळ हिने गाईली, प्रास्ताविक पंडित अवचार तर आभार प्रदर्शन राजकुमार वायचाळ यांनी केले.दुसऱ्या सत्रामध्ये उपस्थित सर्व कुटुंबीयांचा, माझे कुटुंब - माझा अभिमान, या अंतर्गत परिचय घेण्यात आला व प्रत्येकाला भेटवस्तू देण्यात आली. अतिशय मजेदार व सुंदर रित्या हे सत्र संपन्न झाले. या सत्राचे सूत्रसंचालन शिवराज सरनाईक व महेश राखुंडे यांनी केले. आभार प्रदर्शन खंडेराव सरनाईक यांनी केले.

 तिसऱ्या सत्रांमध्ये  निमंत्रित सर्व बालक, महिला,पुरुष मंडळींना स्वादिष्ट असे धोंडे जेवण देण्यात आले. चौथ्या  सत्रामध्ये अध्यक्षा म्हणून समाजसेविका सुनीताताई मुळे या उपस्थित होत्या.नांदेड येथील सुप्रसिद्ध व्याख्याते तुकाराम कल्याणकर यांचे स्वास्थ जाणीव जागृती, आहार- विहार, व्यायाम इत्यादी संदर्भामध्ये सविस्तर असे मार्गदर्शन झाले. मार्गदर्शना नंतर प्रश्न उत्तरे घेण्यात आली. या सत्राचे  प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन हरिभाऊ मुटकुळे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवाजीराव ढोकर पाटील यांनी केले.

 पाचव्या व अंतिम  सत्रामध्ये विविध गुणदर्शन, गीत गायन,खेळ, अंगी असलेली कौशल्य याची अभिव्यक्ती करण्यात आली. यामध्ये गीत गायन, बासरी वादन, तोंडी गणिताची आकडेमोड आदीसह मुला-मुलीं द्वारा सादरीकरण करण्यात आले. शेवटी पंडित अवचार यांनी उपस्थित सर्वांचे व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. अशा रीतीने भरगच्च अशा पाच सत्रांमध्ये  शिवराज्याभिषेक दिनानिमित्त घेतलेला शिव कुटुंब मेळावा अभिनवरित्या  व उत्साह पूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला.

या (Shiva Rajyabhishek ceremony) मेळाव्यासाठी मागच्या अनेक दिवसापासून खंडेराव सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीराव ढोकर पाटील, पंडित अवचार, राजकुमार वायचाळ, पंडित शिरसाट, सुधाकर मेटकर, हरिभाऊ मुटकुळे, डॉ.नामदेव कोरडे, सुधाकर बल्लाळ, महेश राखुंडे, नितीन इंगळे, शिवराज सरनाईक, सुनीताताई मुळे, गजानन सावके, संदीप बोरकर, गजानन जाधव,भालेराव आदी सह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026