Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > देश

Raksha Bandhan 2026

रक्षाबंधन २८ ऑगस्टलाच; भद्रेचा अडथळा नाही, चंद्रग्रहणाचाही परिणाम नाही

रक्षाबंधनाच्या तारखेबाबत निर्माण झालेला संभ्रम अखेर दूर झाला आहे.


रक्षाबंधन २८ ऑगस्टलाच भद्रेचा अडथळा नाही चंद्रग्रहणाचाही परिणाम नाही

Raksha Bandhan 2026 |

पाच वर्षांनंतर रक्षाबंधनाच्या दिवशी ‘भद्रामुक्त’ योग; सकाळपासून सायंकाळपर्यंत राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त

उदगीर : रक्षाबंधनाच्या तारखेबाबत निर्माण झालेला संभ्रम अखेर दूर झाला आहे. पंचांगकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा शुक्रवार, २८ ऑगस्ट रोजीच रक्षाबंधन साजरे करावे. विशेष म्हणजे तब्बल पाच वर्षांनंतर यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी ‘भद्रामुक्त’ योग असल्याने राखी बांधण्यासाठी भद्रेचा अडथळा राहणार नाही. तसेच या दिवशी होणाऱ्या चंद्रग्रहणाचा रक्षाबंधनावर कोणताही परिणाम नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

रक्षाबंधन नेमके २७ की २८ ऑगस्टला साजरे करायचे, यावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. भद्रा, तिथी आणि चंद्रग्रहण या तिन्ही बाबींमुळे राखी बांधण्याच्या वेळेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र पंचांगानुसार २७ ऑगस्टऐवजी २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे करण्याचा निर्णय स्पष्ट झाला आहे.

पाच वर्षांनंतर ‘भद्रामुक्त’ योग

धार्मिक परंपरेनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा असल्यास राखी बांधणे टाळले जाते. यंदाच्या रक्षाबंधनाचे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल पाच वर्षांनंतर या दिवशी ‘भद्रामुक्त’ योग आला आहे. त्यामुळे बहिणींना भावाच्या मनगटावर राखी बांधण्यासाठी शुभ वेळ निवडणे अधिक सोयीचे होणार आहे.

सकाळपासून सायंकाळपर्यंत शुभ मुहूर्त

पंचांगानुसार, २८ ऑगस्ट रोजी सकाळी ६.२५ वाजल्यापासून राखी बांधण्यासाठी विविध शुभ वेळा उपलब्ध आहेत. यामध्ये सकाळी ६.२५ ते ९.४२, सकाळी १०.०२ ते १०.३३, दुपारी १२.२६ ते १२.४०, दुपारी १.१५ ते १.५० आणि सायंकाळी ५.३२ ते ६.४० या वेळांचा समावेश आहे.

त्यामुळे नोकरी, व्यवसाय अथवा अन्य कारणांमुळे सकाळच्या वेळेत राखी बांधणे शक्य नसलेल्या भावंडांनाही दिवसभरातील उपलब्ध शुभ मुहूर्तानुसार रक्षाबंधन साजरे करता येणार आहे.

चंद्रग्रहणाचा रक्षाबंधनावर परिणाम नाही

२८ ऑगस्ट रोजी चंद्रग्रहण असल्याने त्याचा रक्षाबंधनाच्या सणावर काही परिणाम होणार का, अशीही चर्चा होती. मात्र पंचांगकर्त्यांच्या माहितीनुसार चंद्रग्रहणाचा रक्षाबंधनावर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे ग्रहणाबाबतच्या अफवा किंवा संभ्रमामुळे सणाचा उत्साह कमी करण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

बाजारपेठेतही राखीची लगबग

रक्षाबंधनाची तारीख आणि शुभ मुहूर्त स्पष्ट झाल्याने बाजारपेठेतही सणाची तयारी वेगाने सुरू झाली आहे. राखी, मिठाई, भेटवस्तू आणि पूजासाहित्याच्या खरेदीला वेग आला असून विविध प्रकारच्या आकर्षक राख्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. भावासाठी आवडती आणि खास राखी निवडण्यासाठी बहिणींची लगबग सुरू झाली आहे.

रक्षाबंधन हा केवळ राखी बांधण्याचा धार्मिक विधी नसून बहिण-भावाच्या प्रेम, विश्वास आणि जिव्हाळ्याचे प्रतीक असलेला सण आहे. त्यामुळे भद्रा आणि चंद्रग्रहणाबाबत निर्माण झालेला संभ्रम आता दूर झाला असून २८ ऑगस्ट रोजी भद्रेचा अडथळा नाही आणि ग्रहणाचाही परिणाम नाही. परिणामी यंदा रक्षाबंधनाचा उत्साह अधिक वाढण्याची शक्यता आहे.

Related to this topic: