Breaking News
  • साताऱ्यातील पाथरपुंजला सर्वात जास्त पावसाची नोंद
  • लोणावळ्यात 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद.
  • सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
  • पुण्यातील स्टील गोडाऊनवर गोळीबार प्रकरणी वापरण्यात आलेली बाईक पोलिसांकडून जप्त
  • विलास घुले हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन
  • जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
  • अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात दमदार पाऊस
  • नाशिकच्या सातपूर एमआयडीसी परिसरात एका कंपनीला भीषण आग
  • महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधात सोलापुरातील मनसे झाली आक्रमक

होम > क्राईम जगत

विवाहितेची आत्महत्या

पैशांच्या वादातून विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; छळ केल्याचा आरोप

Married Woman suicide: चिखली येथील विवाहित महिलेने मानसिक छळामुळे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मृतकाच्या कुटुंबियांनी संबंधित महिलेवर छळ केल्याचा आरोप लावला आहे.


पैशांच्या वादातून विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या छळ केल्याचा आरोप

Married Woman suicide |

चिखली (Married Woman suicide) : शहरात रहाणाऱ्या विवाहित महिलेने सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दिनांक७ मे रोजी उघडकीस आली. या प्रकरणी मृत महिलेच्या वडिलांनी चिखली पोलिस ठाण्यात तक्रार देत संबंधित महिलेवर गंभीर आरोप केले आहेत.
       
मृत महिला रबिनाबी अकील शाह (वय ३३) ही चिखली येथे वास्तव्यास होती. तिचे वडील मेराखुर्द येथील मुक्तार  शाह अकबर शाह यांनी चिखली पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार,  मुन्नी उर्फ सुलताना सलीम खान यांनी रूबिनाच्या मध्यस्थीने तिच्या घरासमोर रहाणाऱ्या एका महिलेला दोन वर्षांपूर्वी ३० हजार रुपये  दिले होते मात्र सदर महिलेने पैसे परत न केल्यामुळे त्या पैशांच्या परतफेडीवरून सतत वाद होत होता.रुबीना ही मध्यस्थी असल्यामुळे तिलाही या भांडणाचा वारंवार मानसिक त्रास दिला जात होता, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार पैसे घेतलेल्या महिलेने पैसे परत न दिल्यास रुबि नाला व तिच्या मुलांना घराबाहेर काढण्याची तसेच (Married Woman suicide) जीव मारण्याची धमकी दिली होती. या प्रकारामुळे रुबिना मानसिक तणावात होती, असेही कुटुंबीयांनी म्हटले आहे. दिनांक ७ मे २०२६ रोजी सकाळी ९.३०वाजता चिखली येथुन रुबीना मुलीचा फोन आल्यानंतर कुटुंबीय चिखली येथील शासकीय रुग्णालयात पोहोचले असता रुबीना मृत अवस्थेत आढळून आली.

यापूर्वी ६ मे रोजी सायंकाळी मुनव्वर सुलताना सलीम खान यांनी घरी येऊन रविनाच्या आईसोबत वाद घालत धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सततच्या मानसिक छळामुळे रुबीनाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप करत संबंधित महिलेवर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

Related to this topic: