Breaking News
  • 40 वर्षापासून सुरू असलेल्या अवैध दारू धंद्यांवर पोलिसांनी का कारवाई केली नाही - अण्णा बनसोडे
  • मनोज जरांगे पाटील यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासणीसाठी नकार दिला
  • शिरूर तालुक्यातील इनामगाव येथे मायेपुढे बिबट्याही नमला; सासूसाठी सुनबाई आणि नातू बिबट्याला भिडले!
  • शिर्डीहून मुंबईकडे निघालेले प्रसाद लाड पुन्हा अंतरवली सराटीकडे रवाना
  • गोकुळ निवडणुकीत ‘हलाल सर्टिफिकेट’चा नवा वाद
  • कांदा, साखर प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा- सुनेत्रा पवार
  • व्यापाऱ्यांकडून नाही तर शेतकाऱ्यांकडून कांदा खरेदी व्हावा ही मागणी- देवेंद्र फडणवीस
  • गडचिरोली जिल्ह्यात हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा रेड व ऑरेंज अलर्ट देण्यात आला
  • वाशिमच्या तोंडगाव फाटा परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट

होम > क्राईम जगत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

वसमत शहरात जयंती मिरवणुकी दरम्यान सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या तिघांना अटक

Dr. Babasaheb Ambedkar: वसमत शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दरम्यान तीन जणांनी सार्वजनिक शांतता भंग केला. पोलिसांनी त्यांना अटक केली आणि अनुचित प्रकार टाळला.


वसमत शहरात जयंती मिरवणुकी दरम्यान सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या तिघांना अटक

Dr. Babasaheb Ambedkar |

हिंगोली (Dr. Babasaheb Ambedkar) : भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वसमत शहरात मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडावी यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी शहरातील प्रमुख चौक व फाट्यांवर कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक साध्या वेषात सतत पेट्रोलिंग करीत होते.

सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आसेगाव कॉर्नर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर तीन इसम आपापसात जोरदार भांडण करून सार्वजनिक शांतता बिघडवत होते. बंदोबस्तावरील पोलिसांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

त्याच वेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने हस्तक्षेप करून मारामारी करणारे मुंजा चंद्रमुनी भिसे, माधव मारोती वाघमारे व विशाल मारोती वाघमारे, सर्व रा. मुडी ता. वसमत, यांना ताब्यात घेतले. तिघांविरुद्ध वसमत शहर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम 194 व 115 अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार गजानन पोकळे, आकाश टापरे, साईनाथ कंठे, ज्ञानेश्वर गोरे यांच्या पथकाने केली. पोलिसांच्या तत्परतेमुळे जयंती उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही व शहरातील शांतता अबाधित राहिली.

Related to this topic: