Breaking News
  • सलग दुसऱ्या दिवशी शिंदखेडा शहरासह जिल्हात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी
  • पुण्यात कोयत्याची दहशत कायम, हातात कोयता आणि बंदूक घेऊन तरुणाने पसरवली दहशत
  • अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदमधील प्रभाग 4 मध्ये भाजपचा दुहेरी विजय
  • अकोला जिल्ह्यातील पातुर नगरपालिकेवर काँग्रेस- शिवसेना उबाठा आघाडीचे वर्चस्व
  • गडचिरोली नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत 264 मतांनी भाजपचे अंकुश नैताम विजयी
  • भरत गोगावले पालक मंत्री होणार यात शंका नाही - आमदार महेंद्र थोरवे
  • रायगड जिल्ह्यातील स्विमिंग पूल 30 जून पर्यंत बंद ठेवण्यासंबंधी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आदेश जारी केले आहेत.
  • गडचिरोलीत 5 परीक्षा केंद्रांवर नीट-यूजीची फेरपरीक्षा सुरू
  • पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवात

होम > क्राईम जगत

वसमत गुन्हा

वसमतमध्ये डीजेवाल्यांची पोलिसांना नाही भीती; पुन्हा गुन्हा दाखल

Wasmat Crime: वसमतमध्ये डीजे वाजवल्यामुळे पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आवाजाच्या मर्यादा ओलांडल्यामुळे व विनापरवाना डीजे वाजवल्यामुळे दोन जणांविरुद्ध कारवाई केली गेली.


वसमतमध्ये डीजेवाल्यांची पोलिसांना नाही भीती पुन्हा गुन्हा दाखल

Wasmat Crime |

डिजेवाल्यांना पोलिसांची राहिली नाही भीती

वसमत (Wasmat Crime) : शहर पोलिसांनी डीजे वाजवल्या प्रकरणी पुन्हा एक गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये विनापरवाना डीजे वाजवला आवाजाच्या मर्यादेचा भंग केला व प्रदूषण केले, म्हणून जयंती मिरवणुकीचे आयोजक व डीजे मालक अशा दोन जना विरोधात गुन्हा नोंदवला आहे. वसमत शहर पोलिसांनी डीजे विरोधात गुन्हे नोंदवले आहेत मात्र डीजे मालक पोलिसांच्या कारवाईला भीत नसल्याचे यानित्ताने पहावयास मिळाले आहे.

वसमत शहर पोलीस ठाण्याचे पोलिस शिपाई  विनोद शेषेराव दळवी यांनी वसमत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली की. ११ एप्रिल रोजी  महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती मिरवणुकी मध्ये डिजे वादय जोर जोरात वाजवीत असतांना पोलीसांनी आवाज कमी करणे बाबत वांरवार सांगुन सुध्दा आवाज कमी न करता डिजे वाद्य जोरात कर्ण कर्कशपणे मर्यादेपेक्षा आधीक आवाजात वाजवुन ध्वनी प्रदुषण कायद्याचे व पोलीसांच्या आदेशाचे उल्लंघन केले. या (Wasmat Crime) तक्रारीवरून जयंती मंडळाचे आयोजक विश्वनाथ कोंडजी गोरे रा. वसमत, डी जे मालक गजानन बालाजी गारकर राहणार वसमत यांच्या विरोधातपुन्हा नोंदवण्यात आला आहे. डीजे लावलेला पिकअप एम एच २२ एन २२१९  आणि डीजेचे दोन मोठे साऊंड बॉक्स ताब्यात घेण्यात आले आहेत. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षकस सुधारत वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मात्रे करत आहेत.

यापूर्वीही दाखल झाले होते गुन्हे

यापूर्वी श्री राम जयंती मिरवणुकी मध्ये डीजे वाजवल्या प्रकरणे वसमत शहर पोलिसांनी डीजे वाजवल्या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे डीजे वाले मिरवणुकीत डीजे बंद करतील असे वाटत होते; मात्र कारवाईचा कोणताही परिणाम डीजे मालकांवर झालेला दिसत नाही डीजे वाजवण्यास बंदी आहे. कारवाई होऊ शकते हे बीपी मालकांना माहित आहे तरी सुद्धा ते कारवाईला भीत नाहीत पोलीस कारवाई करतात. मात्र मिरवणूक संपल्यावर गुन्हे दाखल करतात. त्यामुळे (Wasmat Crime) डीजे मालकांना डीजे वाजवण्याचा मोबदला मिळतो नाचणार्‍यांनाही उन्माद करता येतो त्यामुळे डीजे लावण्या मागचे साध्य होतो. कायद्याचे उल्लंघन झाले याचे कोणाला सोयर सुतक नाही, गुन्हा दाखल केल्यानंतर अटक होण्याची कारवाई होत नाही.

डीजे जप्त (Wasmat Crime) करण्याची कारवाई होत नाही. त्यामुळे कोणतेही मोठे नुकसान होत नाही कायद्यानुसार बंदी असली तरी डीजे वाजवला जातोच मिरवणुकीमध्ये पोलीस अधिकारी बंदोबस्ताला असतात. त्यांच्या समोरच डीजे वाजवून उन्माद केला जातो. जमावा पुढे पोलिसांना काही करता येत नाही. पोलिसांची अडचण डीजे लावणार आणि डीजे वाल्यांनी ओळखलेलीआहे त्यामुळे डीजे वाले कारवाईला न भिता सर्रास डीजे वाजवून कायद्याचे उल्लंघन करत आहेत.

Related to this topic: