Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > क्राईम जगत

वसमत पोलीस कारवाई

वसमतच्या जिल्हा परिषद मैदानावरील तळीरामांवर एलसीबीची कारवाई

Wasmat police action: वसमतच्या जिल्हा परिषद मैदानावर संध्याकाळी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या पाच जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.


वसमतच्या जिल्हा परिषद मैदानावरील तळीरामांवर एलसीबीची कारवाई  

Wasmat police action |

पाच जणांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेले
जिल्हा परिषद मैदानावर नियमित तपासणी केली जाणार

हिंगोली (Wasmat police action) : जिल्हा परिषद मैदानावर संध्याकाळच्या वेळी दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवर स्थानिक गुन्हे शाखेने दणका दिला. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 21 एप्रिल ला मंगळवारी सायंकाळी जिल्हा परिषद मैदानाची नाकेबंदी करून छापा टाकला. यावेळी मद्यपान करणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेऊन वसमत शहर पोलीस स्टेशनला नेण्यात आले व त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

यामध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या मध्ये सुभाष दत्तराव अडलिंगे, रा. सोमवार पेठ वसमत , शेख सत्तार शेख जफर रा. रतन नगर वसमत, महबूब खान तसलीम खान पठाण, वय 40, रा. कवठा रोड वसमत, शिवाजी सूर्यभान कोरडे, रा. मुसापुर शहा वसमत , सय्यद मुजीब सय्यद मैनुद्दीन, रा. कोहिनूर कॉलनी वसमत

एलसीबीच्या छाप्यामुळे मैदानावरील हौशी रिकामटेकड्यांची एकच पळापळ झाली. यापुढेही (Wasmat police action) जिल्हा परिषद मैदानावर नियमित चेकिंग करण्यात येणार असून गैरवर्तन करणाऱ्यांवर आणखी कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे मैदानावर एकांतात गैरवर्तन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना व पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि घेवारे, आकाश टापरे, साईनाथ कंठे, शिवाजी जाल्मिरे व ज्ञानेश्वर गोरे यांच्या पथकाने केली.

Related to this topic: