Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > क्राईम जगत

उदगीर दुहेरी हत्याकांड

शेतीच्या वादातून झालेल्या दुहेरी हत्याकांडातील ३ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

Udgir double murder: उदगीर येथे शेतीच्या वादातून झालेल्या दुहेरी हत्याकांडात तिघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली. इतर दोन महिला आरोपींना मुक्त करण्यात आले.


शेतीच्या वादातून झालेल्या दुहेरी हत्याकांडातील ३ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

Udgir double murder |

 

उदगीर न्यायालयाचा मोठा निकाल

उदगीर (Udgir double murder) : शेतीच्या वादातून झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात उदगीर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने तिघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावत महत्त्वपूर्ण निकाल दिला. शेतीच्या वादातून झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात उदगीर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने तिघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. बी. म्हालटकर यांनी दि.८ मे रोजी  गुरुवारी  हा निकाल दिला.या प्रकरणातील हकिकत अशी की, दि. ११ फेब्रुवारी २०२१ रोजी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतीच्या वादातून हिंसक घटना घडली होती. आरोपी बालाजी जगताप, अंकुश जगताप, लहू जगताप, फुलाबाई जगताप व पूजा जगताप यांनी संगनमत करून गोविंद जगताप व नितीन फावडे यांचा खून केला तसेच भगवान जगताप यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती.

या (Udgir double murder) घटनेप्रकरणी जनाबाई बिरादार यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक  दिलीपकुमार वाघमारे यांनी करुण  दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.वाढवणा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक दिलीपकुमार वाघमारे  यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.

या (Udgir double murder) खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाच्या वतीने एकूण २१ साक्षीदार तपासण्यात आले, तर बचाव पक्षाच्या वतीने ६ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. साक्षीपुरावे, वैद्यकीय अहवाल, इतर कागदपत्रे तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी बालाजी जगताप, अंकुश जगताप व लहू जगताप रा. हेर ता. उदगीर यांना भारतीय दंड संहितेच्या कलमा अंतर्गत जन्मठेप, जीवे मारण्याच्या प्रयत्नासाठी १० वर्षे सश्रम कारावास, कलम ३२४ अंतर्गत १ महिन्याचा सश्रम कारावास तसेच प्रत्येकी दंडाची शिक्षा सुनावली.

या (Udgir double murder) प्रकरणातील महिला आरोपी फुलाबाई जगताप व पूजा जगताप यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील अॅड. शिवकुमार गिरवलकर यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. आर. पी. गंभीरे तसेच कोर्ट पैरवी अधिकारी अक्रम शेख यांनी सहकार्य केले.

Related to this topic: