Breaking News
  • हिंगोलीत आरोग्य प्रशासनाचा अनास्थेपना, जिल्ह्यात दाखल झालेल्या तीन शववाहिका धूळखात पडून
  • अमरावती पोलिस अंमलदारच निघाला गुटखा तस्कर; शहर पोलिस दलात खळबळ
  • दुपारी २.३० वाजता पुण्यातील पत्रकार संघात अभिजित दिबके यांची पत्रकार परिषद
  • बुलढाण्यात खडकपूर्णा धरणाच्या पाणीपुरवठा लाईनला गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • पुण्यातील महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी
  • बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरमध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघात
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्या दुपारी चार वाजता कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन
  • पुण्यात उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला विद्यापीठाकडून परवानगी
  • पुण्यात बीडीडीएस कडून संपूर्ण पालिका इमारतीचा तपास पूर्ण; बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून महापौर कार्यालय, आयुक्त कार्यालय यासह सगळ्या कार्यालयांची तपासणी

होम > क्राईम जगत

वाळू तस्करी कारवाई

पूर्णा नदीपात्राच्या चिमेगाव घाट परिसरात वाळू तस्करावर मोठी कारवाई; १ कोटी २५ लाखाचा मुद्देमाल जप्त

Sand Smuggling operation: तालुक्यातील चिमेगाव शिवारातील पूर्णा नदीपात्रात जेसीबी द्वारे वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनावर नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, औंढा नागनाथ महसूल


पूर्णा नदीपात्राच्या चिमेगाव घाट परिसरात वाळू तस्करावर मोठी कारवाई १ कोटी २५ लाखाचा मुद्देमाल जप्त

Sand Smuggling operation |

औंढा नागनाथ (Sand Smuggling operation) : तालुक्यातील चिमेगाव शिवारातील पूर्णा नदीपात्रात जेसीबी द्वारे वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनावर नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, औंढा नागनाथ महसूल व पोलीस यांच्या संयुक्त पथकाने दिनांक चार जून रोजी पहाटे एक वाजेच्या सुमारास कारवाई करून २ जेसीबी, ३ हवा टिप्पर, १ ट्रॅक्टर असा एक कोटी २५ लाख ३० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून वाहन चालक-मालक यांच्यावर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तालुक्यातील चिमेगाव शिवारातील पूर्णा नदीपात्रात मागील काही दिवसापासून बेसुमार जेसीबी द्वारे वाळू उपसा (Sand Smuggling operation) सुरू असल्याची माहिती मिळाली होती त्यावरून नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांचे पथकातील पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे,औंढा नागनाथ तहसीलदार हरीश गाडे, यांच्या संयुक्त पथकाने दिनांक ४ जून रोजी भल्या पहाटे एक वाजे दरम्यान कारवाई करून विना क्रमांकाच्या २ जेसीबी, टिप्पर क्रमांक एम एच ३८ एक्स १४१५,व २ विना क्रमांकाचे टिप्पर १ विना क्रमांकाचे ट्रॅक्टर असा १ कोटी २५ लाख ३० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून सदरील वाहने औंढा नागनाथ पोलीस ठाणे येथे आणून लावण्यात आले आहेत.

याप्रकरणी मंडळ अधिकारी अशा गीते यांच्या फिर्यादीवरून दोन विना क्रमांकाच्या जेसीबी ज्याचे चालक-मालक,व  दोन विना क्रमांकाचे टिप्पर, एक टिप्पर एम एच ३८ एक्स १४१५ ज्याचे चालक-मालक नाव गाव माहित नाही तसेच एक विना क्रमांकाचे ट्रॅक्टर चालक,मालक अशा दहा जनावर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जीएस राहीरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल इंगोले करत आहेत.