Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > क्राईम जगत

वसमत चाकू हल्ला

रुंज येथे जुन्या भांडणातून हल्ला: चाकूच्या वाराने तरुण गंभीर जखमी

Vasmat knife Attack: रुंज येथे सकाळी चाकूच्यावर धमका करण्यात आल्यानंतर दिवसभरचे वादविकास झाले. आरोपी संदीप बसवंते याला पोलिसांनी अटक केली.


रुंज येथे जुन्या भांडणातून हल्ला चाकूच्या वाराने तरुण गंभीर जखमी

Vasmat knife Attack |

 

आरोपीला वसमत ग्रामीण पोलिसांनी घेतले ताब्यात

हिंगोली (Vasmat knife Attack) : वसमत तालुक्यातील रुंज येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर चाकूने वार करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  गजानन चांदू लोखंडे, रा. रुंज ता. वसमत हे 4 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरासमोर उभे होते. याचवेळी आरोपी संदीप किशन बसवंते, रा. रुंज याने गजानन लोखंडे यांच्या घरावर दगड मारल्याचा संशय व्यक्त करत त्यांना शिवीगाळ केली. (Vasmat knife Attack) वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने जिवे मारण्याच्या उद्देशाने हातातील चाकूने गजानन लोखंडे यांच्या पाठीत वार केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले.

या घटनेनंतर गजानन लोखंडे यांच्या तक्रारीवरून वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात हा गुन्हा विविध कलमान्वये नोंदवण्यात आला आहे.  वसमत ग्रामीण पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी संदीप बसवंते याला ताब्यात घेतले आहे. या (Vasmat knife Attack) गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एकनाथ डक हे करत आहेत.