Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > क्राईम जगत

परभणी वाळु माफिया

परभणीत वाळु माफियांना दणका; नदीपात्रातील बोटी स्फोटकाने उडविल्या..!

Parbhani sand mafia: पूर्णा पोलीस ठाण्याचा कारभार हाती घेताच नवनियुक्त पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी  पहिल्याच दिवशी वाळु माफियांवर कारवाई धडक कारवाई केली आहे.


परभणीत वाळु माफियांना दणका नदीपात्रातील बोटी स्फोटकाने उडविल्या

Parbhani sand mafia |

 

पुर्णा नदीपात्रात पिंपळगाव (बा) येथे पोलीसांची कारवाई; दोन पोकलेन जप्त 

परभणी (Parbhani sand mafia) : पूर्णा पोलीस ठाण्याचा कारभार हाती घेताच नवनियुक्त पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी  पहिल्याच दिवशी वाळु माफियांवर कारवाई धडक कारवाई केली आहे.   बुधवार  २० मे रोजी दुपारी पिंपळगाव (बा) शिवारातील पूर्णा नदीपात्रात चालू असलेल्या अवैध वाळू उपशावर धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी ४५ लाख रुपये किमतीच्या दोन  पोकलेन मशीन जप्त केल्या.  तसेच नदीपात्रात उतरवलेल्या ५ अवैध सक्शन बोटी जिलेटिनच्या साहाय्याने स्फोटाने नष्ट केल्या.

पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी जिल्ह्यात पदभार घेतल्यापासून (Parbhani sand mafia) अवैध धंदे चालकाविरुध्द मोहिम सुरु केली आहे.  त्यांच्या  सूचनेवरून पूर्णा पोलीस ठाण्यात हजर झालेले नवीन पोनि. सचिन बेंद्रे यांनी   पोलीस उपनिरीक्षक इंगोले, पोह. शेख ताजोद्दीन, पोशि. माधव आक्कलवाड यांचे विशेष पथक तयार केले. बुधवार, २० मे रोजी दुपारी सव्वा एक च्या सुमारास पिंपळगाव (बा) शिवारात पूर्णा नदीच्या पात्रातून कोणतीही परवानगी नसताना  यंत्रसामग्री लावून शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवून वाळू चोरी सुरू असलेल्या ठिकाणाला पोलिसांनी अचानक वेढा घातला. (Parbhani sand mafia) पोलिसांची गाडी पाहताच नदीपात्रात बेकायदेशीर काम करणारे दोन्ही पोकलेन चालक आणि बोटीवरील मजूर कारवाईच्या भीतीने यंत्रसामग्री घटनास्थळावरच सोडून पसार झाले. या प्रकरणी पोलीस शिपाई माधव धोंडीबा आक्कलवाड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात पोकलेन चालक व बोट मालकांविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इंगोले  करीत आहेत. 

अवैध धंदे चालवणार्‍यांची गय केली जाणार नाही  -पोनि सचिन बेंद्रे

पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली (Parbhani sand mafia) अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. पूर्णा पोलीस ठाणे  हद्दीत यापुढे कोणताही अवैध वाळू उपसा,   जुगार, गावठी दारू किंवा कुठलेही बेकायदेशीर धंदे चालणार नाहीत.   कायदा तोडणार्‍यांवर  कठोर कारवाई केली जाईल.