Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > क्राईम जगत

परभणी गुन्हा

परभणीत लग्नाचे आमिष दाखवत ठेवले शारीरिक संबंध...?

Parbhani offence: परभणीत एका परप्रांतीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून अडीच वर्ष शारीरिक संबंध ठेवून तिच्या संमतीशिवाय तीनवेळा गर्भपात करण्यात आल्याची फिर्याद गंगाखेड पोलीस ठाण्यात दाखल.


परभणीत लग्नाचे आमिष दाखवत ठेवले शारीरिक संबंध

Parbhani offence |

तीनवेळा केला संमतीशिवाय गर्भपात

परभणी/गंगाखेड (Parbhani offence) : लग्नाचे आमिष दाखवून सुमारे अडीच वर्ष वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत पिडितेच्या संमतीशिवाय तीनवेळा गर्भपात केल्याची फिर्याद २७ वर्षीय परप्रांतीय महिलेने दिल्यावरून गंगाखेड पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की दिल्ली येथील परप्रांतीय २७ वर्षीय महिला पतीसोबत घटस्फोट झाल्याने कामाच्या शोधात अंबाजोगाई येथे आल्यानंतर एका कला केंद्रावर काम करत असतांना ओळख झालेल्या धिरज बालासाहेब जगलपुरे याने तिला (Parbhani offence) लग्नाचे आमिष दाखवून गंगाखेड शहरात रूमवर ठेवले व सुमारे अडीच वर्षापासून तिच्या सोबत वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले यातच पिडीत महिला गर्भवती राहिली असता तिच्या संमतीशिवाय तिला जेवणातून तसेच ज्यूसमधून काही तरी औषधं देत तीन वेळा गर्भपात केला.

नेहमी भांडण करीत मारहाण करून जिवे मारून टाकील अशी धमकी दिल्याची फिर्याद २७ वर्षीय परप्रांतीय महिलेने शनिवार २ मे रोजी रात्री उशिराने गंगाखेड पोलीस ठाण्यात दिल्यावरून मध्यरात्री अंदाजे १:४० वाजेच्या सुमारास धिरज जगलपुरे याच्याविरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत तीनवेळा पिडितेच्या संमतीशिवाय गर्भपात केल्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा (Parbhani offence) पुढील तपास सपोनि दिपाली गित्ते, पोशि संग्राम शिंदे हे करीत आहेत.

Related to this topic: