Parbhani Judge Verdict: मुलींवर अत्याचार करुन जीवे मारुन टाकण्याची धमकी देणे तसेच याची विचारणा करण्यासाठी गेलेल्या पालकांना मारहाण करण्यात आल्याच्या प्रकरणात प्रमुख सत्र न्यायाधिश आर.एम. सदराणी
पाथरी येथील प्रकरण; परभणी प्रमुख सत्र न्यायाधिश यांचा निकाल
परभणी (Parbhani Judge Verdict) : मुलींवर अत्याचार करुन जीवे मारुन टाकण्याची धमकी देणे तसेच याची विचारणा करण्यासाठी गेलेल्या पालकांना मारहाण करण्यात आल्याच्या प्रकरणात प्रमुख सत्र न्यायाधिश आर.एम. सदराणी यांनी आरोपीला कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. पोक्सो कलमांतर्गत २ वर्ष शिक्षा व एक हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला आहे. पाथरी पोलीस ठाणे हद्दितील २०२५ मध्ये घडलेल्या या प्रकरणात न्यायालयाने ५ जून रोजी निकाल दिला आहे.
२० नोव्हेंबर २०२५ रोजी पाथरी येथे पिडित अज्ञान मुली शाळेला जात असताना आरोपी सरफराज खान फेरोज खान पठाण याने मुलींना अत्याचार करुन जीवे मारुन विहिरीत टाकण्याची धमकी दिली. घडला प्रकार मुलींनी पालकांना सांगितला. त्यानंतर (Parbhani Judge Verdict) पालक आरोपीला विचारणा करण्यासाठी गेले असता आरोपीने एका पालकाच्या डोळ्यावर फायटरने मारुन दुखापत केली. यानंतर पालकांनी आरोपीला पकडून पाथरी पोलीस ठाण्यात आणले. आरोपी विरुध्द मारहाण, पोक्सो व इतर कलमाखाली गुन्हा नोंद झाला. सपोनि. बालाजी गायकवाड यांनी तपास करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटला प्रमुख सत्र न्यायाधिश आर.एम. सदराणी यांच्या समोर चालला. सात साक्षीदार तपासण्यात आले.
या (Parbhani Judge Verdict) प्रकरणात न्यायालयाने आरोपी सरफराज खान पठाण याला १ वर्ष कारावास, दिड हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच पोक्सो कायद्यान्वये २ वर्ष शिक्षा आणि एक हजार रुपये दंड सुनावला आहे. या खटल्यात सरकार पक्षाकडून जिल्हा सरकारी वकिल अॅड. ज्ञानोबा दराडे, अॅड. अभिलाषा पाचपोर यांनी काम पाहिले. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोउपनि. सुरेश चव्हाण, दिलीप रेंगे, पोलीस अंमलदार वंदना आदोडे, सचिन धबडगे यांनी काम पाहिले.