Breaking News
  • साताऱ्यातील पाथरपुंजला सर्वात जास्त पावसाची नोंद
  • लोणावळ्यात 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद.
  • सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
  • पुण्यातील स्टील गोडाऊनवर गोळीबार प्रकरणी वापरण्यात आलेली बाईक पोलिसांकडून जप्त
  • विलास घुले हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन
  • जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
  • अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात दमदार पाऊस
  • नाशिकच्या सातपूर एमआयडीसी परिसरात एका कंपनीला भीषण आग
  • महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधात सोलापुरातील मनसे झाली आक्रमक

होम > क्राईम जगत

परभणी दागिने लंपास

परभणीत प्राध्यापकाचे घर फोडले; सोन्याचे दागिने लंपास

Parbhani jewelery lampas: न्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने घर बंद करुन गावी गेलेल्या प्राध्यापकाचे घर फोडत अनोळखी चोरट्यांनी २ लाख ७८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले.


परभणीत प्राध्यापकाचे घर फोडले सोन्याचे दागिने लंपास

Parbhani jewelery lampas |

 

परभणी शहरातील श्रीकृष्ण नगरातील घटना नवा मोंढा पोलिसात नोंद

परभणी (Parbhani jewelery lampas) : उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने घर बंद करुन गावी गेलेल्या प्राध्यापकाचे घर फोडत अनोळखी चोरट्यांनी २ लाख ७८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना १ जून रोजी सकाळी साडे सातच्या सुमारास परभणी शहरातील खानापूर परिसरात असलेल्या श्रीकृष्ण नगर येथे उघडकीस आली. सदर प्रकरणी नवा मोंढा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

निलेश देविसिंग राठोड यांनी फिर्याद दिली आहे. ते श्रीकृष्ण नगर येथे परिवारासह किरायाणे राहतात. महाविद्यालयाला सुट्ट्या असल्याने फिर्यादी हे गावी गेले होते. घर बंद असल्याचा फायदा घेत ३१ मे च्या रात्री साडे दहा ते १ जुनच्या सकाळी साडे सात या (Parbhani jewelery lampas) दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांचे घर फोडून घरातून सोन्याचे मिनी गंठण, नेकलेस, कानातील झुमके, अंगठी व इतर दागिने मिळून २ लाख ७८ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेले. या प्रकरणी नवा मोंढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.