Breaking News
  • Pune: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर
  • Gadchiroli: कौशल्याच्या जोरावर गडचिरोलीच्या तरुणांनी रोजगाराच्या संधी साधाव्यात – खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
  • Raigad - माणगावमधील JTL कंपनीमधील कामागारांच्या सुविधांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक
  • Nagpur: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज राजस्थानच्या दौऱ्यावर
  • Nagpur: ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेचा निकाल सहा महिन्यांपासून रखडला
  • Nashik: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी
  • नागपुरातील कल्याणेश्वर शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी
  • खालापुर तालुक्यातील तुकसई गावचा पुल धोकादायक बनला
  • पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन

होम > क्राईम जगत

परभणी अवैध दारू विक्री

परभणीत मंदिर-शाळेसमोरच अवैध दारू विक्री? सावंगी भांबळेतील ग्रामस्थांचा संताप; तातडीच्या कारवाईची मागणी

Parbhani Illegal Liquor: जिंतूर तालुक्यातील बामणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावंगी भांबळे येथे तीन ठिकाणी अवैध दारू विक्री सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. धक्कादायक बाब


परभणीत मंदिर-शाळेसमोरच अवैध दारू विक्री सावंगी भांबळेतील ग्रामस्थांचा संताप तातडीच्या कारवाईची मागणी

Parbhani Illegal Liquor |

परभणी (Parbhani Illegal Liquor) : जिंतूर तालुक्यातील बामणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावंगी भांबळे येथे तीन ठिकाणी अवैध दारू विक्री सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे गावातील मंदिर आणि शाळेसमोरच खुलेआम दारूची विक्री होत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून, त्यामुळे गावात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, अवैध दारू विक्रीमुळे गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून, वारंवार भांडणे, महिलांचा छळ आणि सामाजिक अस्वस्थतेच्या घटना वाढत आहेत. वाढत्या व्यसनाधीनतेमुळे अनेक युवक आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यावरही विपरीत परिणाम होत असल्याची चिंता पालकांनी व्यक्त केली आहे. या प्रकाराविरोधात शाळेचे मुख्याध्यापक, जागरूक नागरिक आणि ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलने केली असून, संबंधितांवर कारवाईसाठी लेखी निवेदनेही प्रशासनाला दिली आहेत. मात्र, त्यानंतरही अवैध दारू विक्री सुरूच असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

मंदिर व शाळेसारख्या संवेदनशील परिसरात सुरू असलेली अवैध दारू विक्री तात्काळ बंद करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच या व्यवसायाला संरक्षण देणाऱ्यांचाही शोध घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांबाबत बामणी पोलीस किंवा संबंधित प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून, प्रशासनाच्या कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.