Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > क्राईम जगत

पिंपळगाव ठोंबरे घरफोडी

उकाड्यात घराबाहेर झोपले; चोरट्यांनी घर साफ केले..

Pimpalgaon Thombre Burglary: परभणी तालुक्यातील पिंपळगाव ठोंबरे येथे फिर्यादीच्या कुटुंबाने घराबाहेर झोपल्यावर मध्यरात्रीच्या काही वेळापासून चोरले ८८ हजार रुपये किमतीचे सोनेचे दागिने.


उकाड्यात घराबाहेर झोपले चोरट्यांनी घर साफ केले

Pimpalgaon Thombre Burglary |

 

परभणी तालुक्यातील पिंपळगाव ठोंबरे येथे घरफोडी

परभणी (Pimpalgaon Thombre Burglary) : उकाडा जाणवत असल्याने घराबाहेर झोपल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घरात प्रवेश करत ८८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना परभणी तालुक्यातील पिंपळगाव ठोंबरे येथे घडली. (Pimpalgaon Thombre Burglary) सदर प्रकरणी अनोळखी चोरट्यांवर २२ जून रोजी दैठणा पाोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

निलेश उध्दव हातागळे यांनी तक्रार दिली आहे. २१ जुनच्या रात्री आठ वाजता फिर्यादी, त्यांच्या आई- वडिलांनी सोबत जेवण केले. त्यानंतर फिर्यादी हे नवीन घराकडे झोपण्यासाठी गेले. तर आई- वडिल गरमी असल्याने घराबाहेर मोकळ्या जागेत झोपले. मध्यरात्रीच्या सुमारास फिर्यादीचे वडिल पाणी पिण्यासाठी उठले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. आत जावून पाहणी केल्यावर चोरी झाल्याचे लक्षात आले.

चोरट्यांनी सोन्याचे नेकलेस, झुंबराचे दोन जोड, सोन्याचे मणि, डोरले असे एकूण ८८ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेल्याचे समजले. २१ जूनच्या रात्री आठ ते २२ जुनच्या पहाटे २ या दरम्यान सदर चोरी झाली. या (Pimpalgaon Thombre Burglary) प्रकरणी दैठणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.