Breaking News
  • Pune: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर
  • Gadchiroli: कौशल्याच्या जोरावर गडचिरोलीच्या तरुणांनी रोजगाराच्या संधी साधाव्यात – खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
  • Raigad - माणगावमधील JTL कंपनीमधील कामागारांच्या सुविधांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक
  • Nagpur: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज राजस्थानच्या दौऱ्यावर
  • Nagpur: ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेचा निकाल सहा महिन्यांपासून रखडला
  • Nashik: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी
  • नागपुरातील कल्याणेश्वर शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी
  • खालापुर तालुक्यातील तुकसई गावचा पुल धोकादायक बनला
  • पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन

होम > क्राईम जगत

परभणी सोनसाखळी चोरी

परभणीत भररस्त्यात महिलेला गाठून सोनसाखळी हिसकावली; दुचाकीवरील दोघे पसार

Parbhani gold chain stolen: शहरात साखळीचोर पुन्हा सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. जुन्या पेडगाव रोडवरील अण्णपूर्णा मंगल कार्यालयासमोर दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सुमारे ५ ग्रॅम वजनाचा सोन


परभणीत भररस्त्यात महिलेला गाठून सोनसाखळी हिसकावली दुचाकीवरील दोघे पसार

Parbhani gold chain stolen |

शहरातील अण्णपूर्णा मंगल कार्यालयासमोर घडली घटना; ६० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या गंठणाचा भाग लंपास...!

परभणी (Parbhani gold chain stolen) : शहरात साखळीचोर पुन्हा सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. जुन्या पेडगाव रोडवरील अण्णपूर्णा मंगल कार्यालयासमोर दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सुमारे ५ ग्रॅम वजनाचा सोन्याच्या गंठणाचा भाग दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना शनिवारी (१ ऑगस्ट) रात्री घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणी शहरातील जुन्या पेडगाव रोड परिसरात भररस्त्यात महिलेला लक्ष्य करून सोनसाखळी चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवकांता अशोक कदम (रा. जुना पेडगाव रोड, परभणी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवकांता कदम या आपल्या मुलीसह मार्केटमधून खरेदी करून स्कुटीवरून घरी जात होत्या. शनिवारी (दि. १ ऑगस्ट) रात्री सुमारे ८.१५ वाजण्याच्या सुमारास त्या अण्णपूर्णा मंगल कार्यालयासमोरून जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या स्कुटीजवळ येत गळ्यातील सोन्याच्या शॉट गंठणाचा काही भाग हिसकावून नेला.

चोरट्यांनी अवघ्या काही क्षणांत ही चोरी करून घटनास्थळावरून पलायन केले. चोरीस गेलेल्या सोन्याच्या गंठणाचे वजन सुमारे ५ ग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत ६० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३९८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०४(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निळेकर पुढील तपास करीत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Related to this topic: