Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > क्राईम जगत

परभणी जीवघेणा हल्ला

परभणीत जुन्या वादात तिघांवर तलवार, लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला....!

Parbhani fatal Attack: मानवत येथील  जुन्या भांडणाच्या कारणावरुन डोळ्यात मिरची पुड टाकून तलवार, लोखंडी रॉडने तिघांना जबर मारहाण करत जीवघेणा हल्ला करण्यात आला.


परभणीत जुन्या वादात तिघांवर तलवार लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला

Parbhani fatal Attack |

 

मानवत तालुक्यातील गोगलगाव पाटी जवळील घटना....!

परभणी (Parbhani fatal Attack) : मानवत येथील  जुन्या भांडणाच्या कारणावरुन डोळ्यात मिरची पुड टाकून तलवार, लोखंडी रॉडने तिघांना जबर मारहाण करत जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना ४ जून रोजी रात्री नऊच्या सुमारास मानवत तालुक्यातील गोगलगाव पाटीजवळ घडली. सदर प्रकरणी मानवत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गजानन रमेशराव पाथरकर यांनी तक्रार दिली आहे. त्यांचे मागील एक ते दिड महिन्यापूर्वी गावातील व्यक्तींसोबत गाडी लावण्याच्या कारणावरुन वाद झाला होता. या (Parbhani fatal Attack) प्रकरणात सेलू पोलिसात परस्पर विरोधी गुन्हे दाखल आहेत. ४ जुनच्या रात्री फिर्यादी मानवत येथून गोगलगावकडे जात असताना कृष्णा मगर यांचा फोन आला. तु घराजवळ ये, तुला बोलायचे आहे, असे म्हणाला. यानंतर फिर्यादी त्यांचे मोठे भाऊ केशव आणि चुलता विष्णू हे जि.प. शाळा गोगलगाव समोर आले.

या ठिकाणी आरोपींनी संगणमत करत डोळ्यामध्ये मिरची पुड टाकून तलवार, लोखंडी रॉड, काठीने फिर्यादी, त्यांचे भाऊ आणि चुलत्यावर (Parbhani fatal Attack) जीवघेणा हल्ला केला. जीवे मारण्याच्या उद्देशाने सदर हल्ला करण्यात आला. जखमींना उपचारासाठी परभणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान दिलेल्या तक्रारी वरुन गोपाळ मगर, कृष्णा मगर, अजय उर्फ आदिनाथ, नवनाथ मगर, आबासाहेब मगर, मनकर्णा मगर, सिमा यांच्यावर मानवत पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली आहे.