Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > क्राईम जगत

परभणी अपघाती मृत्यू

परभणीतील पिंगळी रोडवरील अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Parbhani Accidental Death: परभणीत पिंगळी रोडवर छोटा हत्तीच्या धडकेत दुचाकीस्वार सतीश गायकवाडचा मृत्यू झाला. घटना १२ एप्रिल रोजी घडली


परभणीतील पिंगळी रोडवरील अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Parbhani Accidental Death |

छोटा हत्ती चालकाविरुध्द परभणी शहरातील नवा मोंढा पोलिसात गुन्हा

परभणी (Parbhani Accidental Death) : शहरापासून जवळच असलेल्या पिंगळी रोडवरील शेंद्रा शिवारात छोटा हत्ती वाहनाची जबर धडक लागून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना रविवार १२ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली. या (Parbhani Accidental Death) प्रकरणी नवा मोंढा पोलिस ठाण्यात चालका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत (Parbhani Accidental Death) पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, पूर्णा तालुक्यातील मजलापूर येथील सतीश शंकर गायकवाड वय २४ वर्ष, हा तरुण रविवार १२ एप्रिल रोजी एमएच - २२ बीडी -५०९० या क्रमांकाच्या दुचाकीने परभणीहून गावाकडे परत येत होता. पिंगळी रोडवरील  इनामदार पेट्रोल पंपा जवळ शेंद्रा शिवारात आला असताना समोरुन येणार्‍या एमएच -२२ एएन - २८६९ या क्रमांकाच्या छोटा हत्ती या वाहन चालकाने आपले वाहन निष्काळजी व हलगर्जीपणाने चालवून दुचाकीला धडक दिली. या अपघातात सतीश गायकवाड या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या (Parbhani Accidental Death) प्रकरणी मयताचे काका सिध्दार्थ गायकवाड यांनी दिलेल्या  तक्रारीवरुन छोटा हत्तीचालका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related to this topic: