Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > क्राईम जगत

नांदेड वाळू माफिया

नांदेडच्या गोदावरी पात्रात वाळू माफियांवर पोलिसांची मोठी कारवाई

Nanded sand mafia: नांदेड पोलिसांनी 'ऑपरेशन कॅकडाउन' या नावाखाली गोदावरी नदी पात्रावर वाळू उपसा करणारे माफिया १६ जणांचा शोध घेतला, तसेच त्यांच्या ३ कोटीपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त केला.


नांदेडच्या गोदावरी पात्रात वाळू माफियांवर पोलिसांची मोठी कारवाई

Nanded sand mafia |


तब्बल ३ कोटी २१ लाखांचा मुद्देमाल जप्त, १६ जणांवर गुन्हे दाखल

नांदेड (Nanded sand mafia) : गोदावरी नदी पात्रातून बेकायदेशीरपणे वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांवर नांदेड पोलिसांनी 'ऑपरेशन क्रॅकडाऊन' अंतर्गत आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल ३ कोटी २१ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून १६ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. 

नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक  श्रीमती अर्चना पाटील आणि  सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.संयुक्त पथकाचा छापा नांदेड जिल्ह्यात वाळू माफियांनी अवैध मार्गाने वाळू उपसा करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा ,  नांदेड ग्रामीण,  लिंबगाव आणि  सोनखेड यांच्या संयुक्त पथकाने १६ जून रोजी कलंबर, भनगी, पिंपळगाव, मार्कंड आणि गंगाबेट येथील गोदावरी नदी पात्रात एकाच वेळी छापेमारी केली.या छाप्यात पोलिसांनी १२ इंजिन,११ बोटी, २३७ तराफे, ३२ ब्रास रेती असा एकूण  मुद्देमाल: ३ कोटी २१ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
कारवाईदरम्यान जप्त केलेल्या बोटी व इंजिन पाण्याच्या बाहेर काढणे शक्य नसल्याने, पोलिसांनी जिलेटिनच्या साहाय्याने तसेच २३७ तराफे जाळून नष्ट केले आहेत.

या (Nanded sand mafia) प्रकरणी पोलिसांनी  एकूण १६ वाळू माफिया व त्यांच्या साथीदारांवर  नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कारवाई दरम्यान पोलीस येताना पाहून आरोपी घटनास्थळावरून पळून गेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या कारवाई पथकात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अतुल भोसले, नांदेड ग्रामीणचे ओमकांत चिंचोलकर, सोनखेडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भागवत नागरगोजे, लिंबगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनकर या पोलिस अधिकाऱ्यांसह फौजफाटा मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता.