Breaking News
  • साताऱ्यातील पाथरपुंजला सर्वात जास्त पावसाची नोंद
  • लोणावळ्यात 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद.
  • सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
  • पुण्यातील स्टील गोडाऊनवर गोळीबार प्रकरणी वापरण्यात आलेली बाईक पोलिसांकडून जप्त
  • विलास घुले हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन
  • जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
  • अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात दमदार पाऊस
  • नाशिकच्या सातपूर एमआयडीसी परिसरात एका कंपनीला भीषण आग
  • महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधात सोलापुरातील मनसे झाली आक्रमक

होम > क्राईम जगत

नांदेड दुर्घटना

नाल्याच्या पाण्यात बुडून दोन सख्या भावासह इतर दोघांचा मृत्यू

Nanded Children Death: नांदेड शहरात देगलूर नाका येथे चार शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. यामध्ये दोन सख्या भावांचा समावेश होता.


नाल्याच्या पाण्यात बुडून दोन सख्या भावासह इतर दोघांचा मृत्यू 

Nanded Children Death |

नांदेड़ शहर देगलूर नाका

नांदेड (Nanded Children Death) : नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात पोहण्यासाठी गेलेल्या चार शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना आज १६ एप्रिल रोजी घडली. यामध्ये दोन सख्या भावांचा समावेश असल्याची माहिती मिळाली. गुरुवारी सकाळी 11 वाजता नांदेड शहरातील देगलूर नाका इस्लामपुरा भागातील हारूनबाग परिसरात ही दुर्देवी घटना घडली. घटनेची माहिती मिळताच जीवरक्षकानी चारही मुलांना पाण्याबाहेर काढले. 

सदर घटनेची (Nanded Children Death) माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक खन्नाळ, पोलिस उप निरीक्षक प्रवीण आगलावे व  ईतर पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. देगलुर नाका भागातील हारूनबाग परिसरात नालीचे काम सुरु आहे. या कामासाठी एका खाजगी कंत्राटदाराकडून दहा ते पंधरा फुट खोल खड्डा देखील खोडण्यात आला होता. सद्या काम थांबल्याने या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी देखील साचले आहे.

आज सकाळी मोहम्मद अदनान  मोहम्मद फिरोज (वय १० वर्षं), मोहम्मद अली मोहम्मद इद्रिस (वय १३ वर्षं), सय्यद इरफान सय्यद फिरोज (वय १३ वर्ष) व आयान इब्राहिम बागवान (वय ११ वर्ष) हे चार  जण खेळण्यासाठी जातं होते. खड्ड्याजवळ येताच त्यांना पोहण्याचा मोह आवारला नाही. कपडे एका चेंबरवर ठेवून चारही जण पाण्यात उतरले. मात्र पाण्यात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने आणि त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने चार ही जण बुडाले. 

यावेळी अग्निशमन दलाकडून खड्ड्यातील पाणी मोटारीने बाहेर काढण्यात आले. या भागात महापालिकेकडून खासगी कंत्राटदारामार्फत नाल्याचे काम सुरु आहे.बाजूला प्लॉटिंग आहे.हा खड्डा नेमका  खोदला कोणी याबाबत अधिकृत माहिती नाही. या (Nanded Children Death) घटनेला जबाबदार कोण त्याची चौकशी केली जात आहे.

Related to this topic: