Breaking News
  • सुनेत्रा पवारांवरील टीकेवरून संजय काकडेंचे शरद पवार व राहुल गांधींना पत्र
  • आंबोली धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात बंद
  • धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा अमेरिकेच्या दबावामुळे द्यावा लागला - शेतकरी नेते -राकेश टिकैत
  • झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा - अभिजीत दिपके
  • पुण्यातील चारही धरणे १०० टक्के भरले
  • वैशाली नागवडे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड
  • पालघरच्या एमआयडीसीतील कारखान्यात भीषण आग
  • पुण्यात पोलिसांनीच घेतली पोलिसांची "शाळा"
  • Beed : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची विशेष सुनावणी

होम > क्राईम जगत

नागपूर कासव शिकार

कासवाची शिकार करणे पडले महागात; ३ आरोपी वनविभागाच्या ताब्यात

Nagpur Turtle Hunting: वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन करून कासवाची बेकायदेशीर शिकार करून लोखंडी सत्तूर च्या साहाय्याने चिरफाड करून कवटी वेगळी केली व निघालेले संपूर्ण मांस फस्त


कासवाची शिकार करणे पडले महागात ३ आरोपी वनविभागाच्या ताब्यात 

Nagpur Turtle Hunting |

नागपूर (Nagpur Turtle Hunting) : दुर्मिळ आणि संरक्षित वन्यजीवांची शिकार करणे कायद्याने गंभीर गुन्हा असतानाही, पैशांच्या हव्यासापोटी किंवा हौसेपोटी शिकारीचे प्रमाण थांबलेले नाही. वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन करून कासवाची बेकायदेशीर शिकार करून लोखंडी सत्तूर च्या साहाय्याने चिरफाड करून कवटी वेगळी केली व निघालेले संपूर्ण मांस फस्त करणाऱ्या तीन संशयित आरोपींना वनविभागाने धाडसी कारवाई करत अटक केली.

वनपरिक्षेत्र अधिकारी, बुटीबोरी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मौजा सावंगी (दे.) येथे वनविभागाचे कर्मचारी यांनी सापळा रचून दिनांक ०३ ऑगस्ट ला  सायंकाळी ५.४५ वाजता मनोज अर्जुन घरडे रा. वार्ड नं. १ सावंगी (दे.) यांचे राहते घराची झडती घेतली असता, त्यांचे घराचे पाठीमागे असलेल्या आंब्याचे झाडावर दोन फांदीच्या मध्ये वन्यजीव कासवाची एक कवटी ठेवलेली दिसली. तेव्हा मनोज अर्जुन घरडे यांना कासवाचे कवटी बाबत विचारणा केली असता, मंगेश सोनलाल कोसरे वय ३७ वर्षे व  सुनील भाउराव नागोसे वय ३० वर्षे दोघेही रा. सावगी (दे.) यांचे समक्ष कासवाची अवयवाची लोखंडी सत्तूर चे सहायाने चिरफाड करून, कवटी वेगळी करून, निघालेले संपूर्ण मांस ३ व्यक्तीनी फस्त केल्याचे सांगितले.

वणअधिकारी यांनी आरोपी कडून कासवाची कवटी (Nagpur Turtle Hunting) व लोखंडी सत्तूर जप्ती करून, वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम २(१६),९,३९,५०,५१,४९१, ४९ब अन्वये वनगुन्हा क्रमांक ०४९२८/१२९१८८/२०२६दिनांक ०३/०८/२०२६ नोंद करून आरोपी मनोज अर्जुन घरडे, मंगेश सोनलाल कोसारे व सुनील भाउराव नागोसे यांना ताब्यात घेण्यांत आले.सदर कार्यवाही भा.व.से. उपवनसंरक्षक (प्रा.) नागपूर,डॉ विनिता व्यास यांचे मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक जंकास-२ उमरेड,मनोज धनविजय, वनपरिक्षेत्र अधिकारी छबुकांता भडांगे, क्षेत्र सहा. बुटीबोरी पश्चिम,पी ए माटे, वनरक्षक सुकळी (घारापूरे) पी यु पाटील, जी.बी. मुंडे, वनरक्षक आजंनगांव,वाहन चालक रत्नाकर गुलाब चाके यांनी पार पाडली पुढील तपास सहाय्यक वनसंरक्षक जंकास-२ उमरेड,मनोज धनविजय हे करीत आहेत.

विशेष बाब अशी कि, सदर वन्यजीव हे भारतीय फ्लॅपशेल कासव  ज्याचे वैज्ञानिक नांव Lissemys punctata आहे, त्याची संवर्धन स्थिती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत महत्वाची आहे.ही प्रजाती जागतिक स्तरावर "संवेदनशील" म्हणून सूचीबध्द आहे.भारतात या कासवाला "शेडयूल १"  अंतर्गत सर्वोच्च कायदेशीर संरक्षण देण्यांत आले आहे.

वनविभागाचे नागरिकांना आवाहन
वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, वन्यजीवांची शिकार, विक्री किंवा तस्करी करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. अशा प्रकारची कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वन्यजीवांचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.