Aundha Nagnath Theft: जवळा बाजार परिसरातील बारचे अज्ञात चोरट्याने सेटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करत मुद्देमाल चोरून नेल्याची घटना प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद
औंढा नागनाथ (Aundha Nagnath Theft) : तालुक्यातील जवळा बाजार येथील गजानन उर्फ भगवान लक्ष्मणराव काळे यांच्या जवळा बाजार परिसरातील बारचे अज्ञात चोरट्याने सेटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करत मुद्देमाल चोरून नेल्याची घटना १९ नोव्हेंबर रोजी रात्री घडली होती घटने प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता या गुन्ह्याचा औंढा नागनाथ पोलिसांनी तपास करून गुन्ह्यातील ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याकडून हस्तगत करत न्यायालयाच्या आदेशावरून दिनांक १३ जुलै रोजी पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या हस्ते फिर्यादीस परत केला आहे.
तालुक्यातील जवळाबाजार येथे चोरट्याने बारचे सेटर तोडून आत प्रवेश करत मोठा मुद्देमाल चोरून नेला होता याप्रकरणी फिर्यादी गजानन उर्फ भगवान लक्ष्मणराव काळे यांच्या फिर्यादीवरून औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात आज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचा औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत यांनी सीसीटीव्ही फुटेज, व मोबाईल लोकेशन वरून चोरट्याचा तपास करून त्यांच्याकडून नगद ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला व मुद्देमाल औंढा नागनाथ पोलीस ठाणे येथे लेखनिक हवालदार रमेश मस्के यांच्याकडे जमा करण्यात आला होता.
सदरील मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशावरून दिनांक १३ जुलै रोजी फिर्यादी गजानन उर्फ भगवान लक्ष्मणराव काळे राहणार जवळा बाजार यांना पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या हस्ते परत करण्यात आला. यावेळी साह्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत, पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस, जमादार दिलीप नाईक, जमादार शाहेद सय्यद, लेखनिक हवालदार रमेश मस्के, ज्ञानेश्वर सावळे, ओंकारेश्वर रांजणेकर, तानाजी ढाकरे यांची उपस्थिती होती.