Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > क्राईम जगत

Mumbai Local Train Murder

मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची चाकूने हत्या; दरवाजा बंद करण्याच्या वादातून घडली थरारक घटना

मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेत पुन्हा एकदा हिंसक प्रकार घडल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.


मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची चाकूने हत्या दरवाजा बंद करण्याच्या वादातून घडली थरारक घटना

Mumbai Local Train Murder |

बोरिवली-अंधेरीदरम्यान प्रथम श्रेणीच्या डब्यात हल्ला; आरोपीच्या शोधासाठी रेल्वे पोलिसांची सहा पथके तैनात

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेत पुन्हा एकदा हिंसक प्रकार घडल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर लोकलचा दरवाजा बंद करण्याच्या कारणावरून झालेला किरकोळ वाद काही क्षणांतच जीवघेणा ठरला. चर्चगेट ते नालासोपारा फास्ट लोकलच्या प्रथम श्रेणीच्या डब्यात २२ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला असून, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मृत तरुणाची ओळख मयंक लोहार (वय २२) अशी झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना २३ जून रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली ते अंधेरी स्थानकादरम्यान धावणाऱ्या चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकलच्या प्रथम श्रेणीच्या डब्यात घडली.

प्राथमिक तपासानुसार, मुसळधार पावसामुळे ट्रेनचा दरवाजा बंद ठेवण्याच्या मुद्द्यावरून मयंक लोहार आणि एका सहप्रवाशामध्ये वाद झाला. पश्चिम रेल्वे पोलिसांच्या सूत्रांनुसार, या वादानंतर डब्यातील काही प्रवाशांनी संबंधित आरोपीला मारहाण केली. त्यानंतर संतापलेल्या आरोपीने आपल्या बॅगेतून चाकू काढत मयंकच्या पोटावर अनेक वार केले. हल्ल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत मयंक डब्यातच कोसळला आणि ट्रेनमध्ये एकच गोंधळ उडाला.

काही प्रवाशांनी हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्या हातात चाकू असल्याने कोणीही पुढे जाऊ शकले नाही. दरम्यान, ट्रेन बोरिवली स्थानकावर पोहोचण्यापूर्वीच आरोपी लोकलमधून उतरून फरार झाला.

रात्री सुमारे ११ वाजता ट्रेन बोरिवली स्थानकात दाखल झाल्यानंतर जीआरपी आणि आरपीएफ जवानांनी गंभीर जखमी झालेल्या मयंक लोहार यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेनंतर पश्चिम रेल्वेचे कर्मचारी, आरपीएफ, जीआरपी आणि वैद्यकीय पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही बोरिवली स्थानकावर भेट देत संपूर्ण घटनेचा आढावा घेतला.

या प्रकरणातील आरोपीची ओळख पटली असून त्याच्या अटकेसाठी रेल्वे पोलिसांनी सहा विशेष पथके तैनात केली आहेत. तसेच रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

या रक्तरंजित घटनेनंतर मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेबाबत पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, रेल्वे पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
::

Related to this topic: