Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > क्राईम जगत

उदगीर गांजा जप्त

उदगीर शहरात तब्बल 24 किलो गांजासह युवक जेरबंद!

Udgir seized ganja: उदगीर येथील साईनाथ मिर्ची मसाला उद्योगातील दुकानावर 24 किलो बेकायदेशीर गांजा जप्त करण्यात आला. युवक शुभरत्न यांच्यावर मनोव्यापारासंबंधी


उदगीर शहरात तब्बल 24 किलो गांजासह युवक जेरबंद 

Udgir seized ganja |

 

साईनाथ मिर्ची मसाला उद्योगातील दुकानावर एलसीबीची धाड ; 7 लाखा 42 हजाराचा मुद्देमाल जप्त 

उदगीर (Udgir seized ganja) : उदगीर शहरातील अवैध अंमली पदार्थ विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल 24 किलो 740 ग्रॅम बि-मिश्रित सुका गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एका युवकास अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 18 मे 2026 रोजी सायंकाळी 5.40 वाजण्याच्या सुमारास उदगीर येथील हॉटेल ए-1 ते मोंढा जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या शींदे यांच्या साईनाथ मिर्ची मसाला उद्योगातील दुकानावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत आरोपी शुभरत्न उर्फ कपील बाबुराव गायकवाड (वय 19, रा. फुले नगर, उदगीर) याच्या ताब्यातून बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी ठेवलेला 24 किलो 740 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची किंमत 7 लाख 42 हजार 200 रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या (Udgir seized ganja) प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद नानासाहेब देशमुख, स्थानिक गुन्हे शाखा लातूर यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीविरुद्ध गुरनं. 183/2026 अंतर्गत कलम 8(क), 20(ब)(ii)(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद रात्री 11.05 वाजता करण्यात आली आहे.  सदर कारवाई मा. पोलीस निरीक्षक श्री अशोक अनंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हेशाखेची आठवडयातील दुसरी कारवाई
स्थानिक गुन्हेशाखेची या आठवडयातील अवैध धंदयावरील  ही दुसरी कारवाई आहे.स्थानीक गुन्हेशाखेने चार दिवसापूर्वी अवैध गुटख्यावर कारवाई करीत सात लाखाचा गुटखा पकडला होता.त्यानंतर मोठयाप्रमाणावर गांजा पकडला आहे.स्थानिक पोलीस प्रशासन आसतानाही स्थानिक गुन्हे शाखेमार्फत कारवाई केली जात आहे.स्थानिक गुन्हे शाखेची ही दुसरी कारवाई आसल्याने शहरात  स्थानिक पोलीसाच्या क्षमते विषयीची चांगलीच चर्चा चर्चीली जात आहे.

Related to this topic: