Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > क्राईम जगत

चारठाणा पोलिस गुन्हा

परभणीत वृध्द पालकांचा सांभाळ न करणार्‍या मुले-सुनेवर गुन्हा

Charthana Police Case: वृध्द पालकांचा सांभाळ न करत त्यांना शिवीगाळ करत मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे घडली. मुलं, सुनेच्या त्रासाला कंटाळून वृध्द वडिलांची तक्रार


परभणीत वृध्द पालकांचा सांभाळ न करणार्‍या मुले-सुनेवर गुन्हा

Charthana Police Case |

 

जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील प्रकार पालकांना शिवीगाळ करत मारण्याची धमकी...!

परभणी (Charthana Police Case) : वृध्द पालकांचा सांभाळ न करत त्यांना शिवीगाळ करत मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे घडली. मुलं आणि सुनेच्या त्रासाला कंटाळून वृध्द वडिलांनी चारठाणा पोलिसात (Charthana Police Case) तक्रार दिली आहे. ज्येष्ठ नागरीक आणि पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियम अंतर्गत ६ जुलै रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सय्यद अक्तर यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादीची दोन्ही मुले त्यांच्या पासून वेगळी राहतात. शेती विकून संबंधितांना पैसे वाटून दिलेले आहेत. फिर्यादीची पत्नी बिमार असल्याने घरीच असते. वृध्दांना कोणताही कामधंदा येत नाही. घर खर्चासाठी, पत्नीच्या उपचारासाठी पैसे मागितल्यानंतर मुले वाद करतात. यात वृध्दांची हेळसांड होत आहे.  ३ जुलै रोजी फिर्यादी घरी असताना मुलं आणि सुनेने गल्लीतील व्यक्तींना बोअरचे पाणी देण्यावरुन वाद घातला. तुम्हाला खाण्यापिण्यास देणार नाही, असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच मारण्याची धमकी देवून दमदाटी केली. या (Charthana Police Case) प्रकरणी सय्यद खैसर, सय्यद हाफिज, आफरीन बेगम यांच्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.