Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > क्राईम जगत

मलकापूर ग्रामीण पोलिस

तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ; मलकापूर ग्रामीण पोलिसांविरोधात उपविभागीय अधिकाऱ्यांकडे धाव

Malkapur Rural Police: पीडित महिलेची तक्रार योग्य प्रकारे न नोंदवता मूळ घटनेचे स्वरूप बदलणे आणि महिला व अल्पवयीन मुलींना रात्री उशिरापर्यंत बसवून ठेवल्याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांविरोधात तक्रार


तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ मलकापूर ग्रामीण पोलिसांविरोधात उपविभागीय अधिकाऱ्यांकडे धाव

Malkapur Rural Police |

मलकापूर (Malkapur Rural Police) : पीडित महिलेची तक्रार योग्य प्रकारे न नोंदवता मूळ घटनेचे स्वरूप बदलणे आणि महिला व अल्पवयीन मुलींना रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठेवल्याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणारं निवेदन १४ जुलै रोजी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले.

मूळ घटना: ९ जुलै २०२६ रोजी उमाळी (ता. मलकापूर) येथे अनुसूचित जातीच्या महिलेला व तिच्या कुटुंबाला गावातील काही व्यक्तींनी (गुड्डू शेख हमजा, शेख शब्बीर, शेख जावेद, शेख सईद व इतर) जातिवाचक शिवीगाळ, मारहाण, धमकी देऊन महिलेचा विनयभंग केला. ​पोलिसांवर आरोप: या घटनेची तक्रार देण्यासाठी पीडित महिला व अल्पवयीन मुली मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला गेल्या असता, (Malkapur Rural Police) पोलिसांनी फिर्यादीच्या सांगण्यानुसार गुन्हा नोंदवला नाही. आरोपींची नावे व घटना योग्य प्रकारे न लिहिता स्वतःच्या मर्जीने तक्रार लिहून घेतल्याने मूळ घटनेचे स्वरूप बदलले गेले.

​मानसिक छळ: तक्रार नोंदवण्याच्या नावाखाली पीडित महिला व लहान मुलींना रात्री उशिरापर्यंत (Malkapur Rural Police) पोलीस ठाण्यात बसवून मानसिक त्रास देण्यात आला. ​या गंभीर प्रकारामुळे फिर्यादीवर अन्याय झाला असून, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.