Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > क्राईम जगत

कन्हान चोरी प्रकरण

परिसरात चोरट्यांचा धुमाकुळ; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

Kanhan Theft Case: कन्हान परिसरात चोरांची क्रियाकलापे आणि नागरिकांना होणारा त्रास. दोन बांधव घरे व एक शेतातून चोरी होते: रक्कम आणि मुल्यवान वस्तूंचा धोकादायक हस्तांतरण


 परिसरात चोरट्यांचा धुमाकुळ पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

Kanhan Theft Case |

 

दोन घरी व एक शेतात असे तीन ठिकाणी चोरीच्या घटना

कन्हान (Kanhan Theft Case) : परिसरात चोरीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले असुन चोरट्यांचा धुमाकुळ दिवसेंदिवस वाढत आहे. एकाच रात्री टेकाडी गावातील दोन बंद घरे फोडु न रोख रक्कम व मौल्यवान वस्तुंवर डल्ला मारण्यात आला, तर खंडाळा शिवारातील शेतातुन ४५ हजार रुपये किमतीचा सोलर पंप चोरी करण्यात आला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन कन्हान पोलिसांच्या ग्रस्त व गुन्हे प्रतिबंधक यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

टेकाडी गावात एकाच रात्री दोन घरफोडी

माहितीनुसार टेकाडी येथील रहिवासी नंदकिशोर लेकुरवाळे हे कुटुंबासह देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधुन अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाज्याचे कुलुप तोडुन घरा त प्रवेश केला. घरातील सामान अस्ताव्यस्त फेकुन कपाटातील २० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. याच (Kanhan Theft Case) परिसरातील मनोज लेकुरवाळे हे देखिल देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले असतांना चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलुप तोडुन प्रवेश करित कपाटातील साड्या, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तु चोरी करून नेल्या. सलग दोन घरफोड्यांच्या घटनांमुळे टेकाडी गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी सुनिल लेकुरवाळे यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलिसांनी अज्ञात आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

खंडाळा शिवारातील शेतातुन सोलर पंप चोरी

नागपुर येथील रहिवासी नंदकिशोर बिसनलाल गौर यांच्या खंडाळा शिवारातील शेतातुन ही चोरीची घटना उघडकीस आली. नागपुर-जबलपुर राष्ट्रीय महा मार्गावरील कुंभलकर ढाब्यासमोरील त्यांच्या शेतात बसविण्यात आलेला साडेसात अश्वशक्ती क्षमतेचा सोलर पंप अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. चोरी गेले ल्या पंपाची किंमत सुमारे ४५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. नंदकिशोर गौर यांनी दिलेल्या तक्रारी वरून कन्हान पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असुन पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.

कन्हान परिसरात वारंवार होत असलेल्या (Kanhan Theft Case) चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये कन्हान पोलीसावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कारण या अगोदरच्या चोरीचे आरोपी पकडण्यात आले नाही, काही चो-यांचे गुन्हे दाखल होत नसल्याने चोरांचे हौसले बुंलद होत दिवसे दिवस चोरीच्या घटना वाढु लागल्याने रात्रीच्या गस्तीत वाढ करून चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडुन होत आहे. अन्यथा नागरिकां च्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.