Kalmanuri Beef Case: हिंगोलीच्या कळमनुरी येथे 54 किलो गोमांस जप्त करून दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला.
कळमनुरी (Kalmanuri Beef Case) : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या गोवंशाची कत्तल करून गोमांस विक्रीचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत 54 किलो गोमांस जप्त करून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही घटना आज, 9 मे 2026 रोजी सकाळी घडली.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 9 मे 2026 रोजी सकाळच्या सुमारास कळमनुरी येथील नाईकवाडी मोहल्ल्यात वाड्यातील एका ठिकाणी आरोपी गोमांसाची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस ठाणे रवि नारायण इंगोले यांनी पथकासह छापा टाकला. या (Kalmanuri Beef Case) कारवाईत इलियास अहमद कासिम कुरेशी आणि शेख निसार शेख इकबाल कुरेशी, दोघेही रा. नाईकवाडी मोहल्ला, कळमनुरी यांना ताब्यात घेण्यात आले.
आरोपींकडून 54 किलो गोमांस जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत 12,960 रुपये आहे. आरोपींनी संगनमत करून आर्थिक फायद्यासाठी अवैधरित्या गोवंशाची कत्तल करून गोमांस विक्रीसाठी वाहतूक करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या (Kalmanuri Beef Case) प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रेम कुमार माकोडे करीत आहेत. दोन्ही आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.