Kalmanuri Illegal sand transport: हिंगोलीतील कळमनुरीत अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. यावेळी 6.56 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
हिंगोली (Kalmanuri Illegal sand transport) : कळमनुरी तालुक्यातील भुतनर सांगवी फाट्याजवळ सार्वजनिक रोडवर अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी लिंबाजी वाव्हळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. 8 मे रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास आरोपी राष्ट्रपाल दलित इंगोले, रा. वारंगा मसाई हा आपल्या ताब्यातील ट्रॅक्टरमधून विना परवाना बेकायदेशीररित्या गौण खनिज रेतीची चोरटी वाहतूक करताना पोलिसांना आढळला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ट्रॅक्टर ताब्यात घेतले.
या (Kalmanuri Illegal sand transport) कारवाईत 5 लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर हेड, 1.50 लाख रुपये किमतीची ट्रॉली आणि 6000 रुपये किमतीची एक ब्रास रेती असा एकूण 6 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात गौण खनिज अधिनियमासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी राष्ट्रपाल इंगोले याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास इंगोले हे करत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांचे मार्गदर्शनाखाली झालेले कारवाईमुळे वाळू माफीया चे धाबे दणाणले आहे.