Jintoor Ganja Sales: जिल्ह्यातील जिंतूर शहरात सुरू असलेल्या अवैध गांजा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी सायंकाळी धाड टाकत मोठी कारवाई केली.
चारचाकी महिंद्रा TUV वाहनासह १ किलो १९० ग्रॅम गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार
परभणी (Jintoor Ganja Sales) : जिल्ह्यातील जिंतूर शहरात सुरू असलेल्या अवैध गांजा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी सायंकाळी धाड टाकत मोठी कारवाई केली. जिल्हा परिषद शाळेच्या मैदान परिसरातून पोलिसांनी गांजा व वाहनासह तब्बल ६ लाख २९ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी मात्र पोलिसांची चाहूल लागताच वाहन टाकून पसार झाला.
जिंतूर शहरातील गणपती गल्ली परिसरातील अभिजीत उर्फ बिल्ली सुभाष राठोड हा आपल्या ताब्यातील MH 46 AU 2229 क्रमांकाच्या महिंद्रा TUV या चारचाकी वाहनातून गांजाची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने जिल्हा परिषद शाळेच्या मैदान परिसरात सापळा रचून गुरुवारी १४ मे च्या सायंकाळी धाड टाकली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचताच आरोपीने वाहन जागीच सोडून अंधाराचा फायदा घेत पलायन केले. पोलिसांनी तत्काळ त्याचा पाठलाग केला; मात्र आरोपी फरार होण्यात यशस्वी ठरला.
या नंतर नायब तहसीलदार गायकवाड, सपोनि विजय जाधव व पंचांच्या उपस्थितीत वाहनाची झडती घेण्यात आली. या (Jintoor Ganja Sales) झडतीत वाहनातून १ किलो १९० ग्रॅम गांजा आढळून आला. जप्त गांजाची किंमत २९ हजार ७५० रुपये असून वाहनाची किंमत अंदाजे ६ लाख रुपये असल्याचे माहिती पोलिसांनी दिली.या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार यांच्या फिर्यादीवरून जिंतूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध NDPS कायदा १९८५ अंतर्गत कलम 20(b)(ii) व 22 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास जिंतूर पोलीस ठाण्याच्या सपोनि विजय जाधव करीत आहेत.
ही (Jintoor Ganja Sales) कारवाई वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील मार्गदर्शनात पोउपनि चंदनसिंह परिहार, पांडुरंग तूपसुंदर, मुकेश बुधवंत, सिद्धेश्वर चाटे, माणिक डुकरे, राम पोळ, नामदेव डुबे व चालक कश्यप साने यांच्या पथकाने पार पाडली.