Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > क्राईम जगत

तंबाखू-गुटखा कारवाई

शासकीय कार्यालयांतील तंबाखू-गुटखा सेवन करणाऱ्यांवर कारवाई

Tobacco-Gutkha Action: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे आदेशानुसार तंबाकूनिरोधक मोहिमेत जिल्ह्यातील कचेर्यांमध्ये पदरूपात सल्लागारांनी तम्बाकूसह वापरणाऱ्या १४ व्यक्तीवर २७०० रु. दंड वसूल करण्यात आला


शासकीय कार्यालयांतील तंबाखू-गुटखा सेवन करणाऱ्यांवर कारवाई

Tobacco-Gutkha Action |

 

१४ जणांकडून २७०० रुपयांचा दंड वसूल

हिंगोली (Tobacco-Gutkha Action) : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाच्या जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षामार्फत विशेष दंडात्मक कारवाई मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत आज मंगळवारी  १६ जून रोजी जिल्हा कचेरी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात करण्यात आलेल्या तपासणीत तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन करणाऱ्या तसेच तंबाखूयुक्त पदार्थ जवळ बाळगणाऱ्या १४ जणांवर कारवाई करण्यात आली.

अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत कोटपा-२००३ (COTPA) कायद्याच्या कलम ४ चे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. कारवाईदरम्यान १४ व्यक्तींकडून एकूण २ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यामध्ये जिल्हा कचेरीतील १२ तर सार्वजनिक बांधकाम विभागातील २ कर्मचारी व इतर व्यक्तींचा समावेश आहे.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखू-गुटखा सेवन (Tobacco-Gutkha Action) करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाभरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये अचानक भेटी देऊन तपासणी करण्यात येत असून ही मोहीम पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाने (Tobacco-Gutkha Action) सर्व शासकीय कर्मचारी तसेच विविध कामांसाठी शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना कर्तव्यावर असताना अथवा कार्यालयीन परिसरात तंबाखू, गुटखा किंवा अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नये तसेच असे पदार्थ सोबत बाळगू नयेत, असे आवाहन केले आहे.

ही (Tobacco-Gutkha Action) कारवाई जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार डॉ. किरण राजाभाऊ लोंढे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी मानसशास्त्रज्ञ कुलदीप केळकर आणि मेडिकल सोशल वर्कर आनंद साळवे यांनीही मोहिमेत सहभाग घेतला. प्रशासनाने तंबाखूमुक्त कार्यालयीन वातावरण निर्मितीसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.