Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > क्राईम जगत

हिंगोली भूकरमापक भ्रष्टाचार

शेतजमिनीच्या मोजणी शीटसाठी 10 हजारांची लाच घेताना हिंगोलीतील दोन भूकरमापक एसीबीच्या जाळ्यात

Hingoli land surveyor corruption: हिंगोलीतील भूकरमापक उमेश राऊत आणि अविनाश गोरे जमिनीच्या मोजणीसाठी 10 हजार रुपयांची लाच मागितली होती.


शेतजमिनीच्या मोजणी शीटसाठी 10 हजारांची लाच घेताना हिंगोलीतील दोन भूकरमापक एसीबीच्या जाळ्यात

Hingoli land surveyor corruption |

हिंगोली (Hingoli land surveyor corruption) : शेतजमिनीच्या मोजणीची प्रत देण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयातील दोन भूकरमापकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. तडजोडीअंती 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने दोन्ही आरोपींना अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, हिंगोली घटकाने आज ही यशस्वी सापळा कारवाई केली. उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, हिंगोली येथे कार्यरत असलेले आरोपी उमेश मधुकर राऊत आणि अविनाश नंदकिशोर गोरे हे दोघेही भूकरमापक पदावर कार्यरत आहेत. 

हिंगोली शहरातील रीसाला बाजार भागामधील तक्रारदाराची मौजे बासंबा येथे गट क्रमांक 658 मध्ये 36 आर शेतजमीन आहे. या (Hingoli land surveyor corruption) जमिनीच्या मोजणीसाठी त्यांनी उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, हिंगोली येथे अर्ज दाखल केला होता. दोन्ही आरोपींनी सदर जमिनीची मोजणी केली, मात्र मोजणी शीटची प्रत तक्रारदाराला दिली नव्हती. ती प्रत देण्यासाठी आरोपी उमेश राऊत याने तक्रारदाराकडे 15,000 रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने 22 मे 2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीची शहानिशा करण्यासाठी एसीबीने त्याच दिवशी (Hingoli land surveyor corruption) लाच मागणी पडताळणी केली. त्यावेळी दोन्ही आरोपींनी तक्रारदाराकडून यापूर्वीच 4,000 रुपये घेतल्याचे मान्य केले. उर्वरित 11,000 रुपयांची मागणी करून शेवटी 10,000 रुपये देण्याचे पंचासमक्ष ठरले. पडताळणीनंतर 22 मे रोजीच एसीबीने सापळा रचला. उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, हिंगोली येथे आरोपी अविनाश गोरे याने तक्रारदाराकडून पंचासमक्ष 10,000 रुपयांची लाच स्वीकारली. लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले आणि दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

आरोपी उमेश राऊत याच्या अंगझडतीत आधार कार्ड, पॅन कार्ड, शासकीय ओळखपत्र, एक पांढऱ्या धातूची अंगठी, मोटोरोला कंपनीचा मोबाईल आणि 700 रुपये रोख जप्त करण्यात आले. तर आरोपी अविनाश गोरे याच्याकडून एटीएम कार्ड, लायसन, एक पिवळ्या धातूची अंगठी, विवो कंपनीचा मोबाईल, शासकीय ओळखपत्र आणि 5,170 रुपये नगदी जप्त करण्यात आली. दोन्ही आरोपींच्या मोबाईलची तपासणी करून आवश्यकता असल्यास जप्तीची कारवाई केली जाणार आहे. आरोपींच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.

या (Hingoli land surveyor corruption) प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, 1988 च्या कलम 7 व 12 अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपींना अटक केली जाणार आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीमती सुलभा राऊत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पर्यवेक्षक अधिकारी व तपास अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक श्री विकास घनवट काम पाहत आहेत. या कारवाईमुळे भूमी अभिलेख कार्यालयातील भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.

Related to this topic: