Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > क्राईम जगत

कोरची घरफोडी प्रकरण

घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश; अनिल ऊर्फ बिट मतकेर उईके जेरबंद

Korachi Burglary case: नवरगाव तालुक्यातील घरफोडीमध्ये पोलिसांनी गुप्त तपासाने आरोपी अनिल ऊर्फ बिट मतकेर उईकेला अटक करून चोरी केलेल्या रक्कम हस्तगत केली.


घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश अनिल ऊर्फ बिट मतकेर उईके जेरबंद

Korachi Burglary case |

कोरची (Korachi Burglary case) : तालुक्यातील नवरगाव येथे घडलेल्या घरफोडी प्रकरणात कोरची पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणातील फिर्यादी दानसाय नांगसा काटेंगे (रा. नवरगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक २९/०५/२०२६ रोजी ते कुटुंबासह झोपले असताना अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटातील १५,००० रुपये रोख रक्कम चोरी केली होती.

तक्रारीवरून कोरची पोलीस स्टेशन येथे अपराध क्र. ७७/२०२६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांसमोर मोठे आव्हान होते, कारण आरोपी मोबाईलचा वापर करत नव्हता. मात्र, गुप्त माहिती व कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला. तपासात अनिल ऊर्फ बिट मतकेर उईके (रा. नवरगाव) यानेच घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला अटक करून चोरीस गेलेला मुद्देमालही हस्तगत केला आहे. आरोपीला दिनांक ०३/०६/२०२६ रोजी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून, सध्या त्याला जिल्हा मध्यवर्ती कारागृह, चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहे.

ही (Korachi Burglary case) कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरची पोलिसांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पोलिसांचा इशारा: गुन्हेगार कितीही चलाख असला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही!

Related to this topic: